दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशाच्या विकासाचे आकडे दोलायमान होताना दिसतात. त्याचवेळी त्यांच्या कार्यकाळात व्हॅट जाऊन जीएसटी लावण्यात आला. त्यानंतरही पेट्रोलप्रमाणेच शेतीसाठी लागणाऱ्या कीटकनाशक आणि अनेक निविष्ठांवर दणक्यात कर आकारणी चालू आहे.
खतांवर पाच टक्के जीएसटी असतानाच कीटकनाशकांवर मात्र १८ टक्के दराने जीएसटी आकाराला जात आहे. हे जीएसटी लागू होण्याआधी लावलेल्या व्हॅटपेक्षाही (१२%) जास्त आहे.
मात्र, आता कुठे सरकारमधील एका विभागाला याची जाणीव झालेली आहे. त्यानुसार त्यांनी आता रसायन आणि पेट्रोकेमिकल्स विभागाने खतांसह कीटकनाशकांवरील जीएसटी दर सध्याच्या १८ टक्क्यांवरून घटून ५ टक्के करण्याची विनंती केली आहे.
रसायन आणि खतावर स्थापन स्थायी समितीने संसदेत सादर केलेल्या अहवालात कृषी संबंधित सामग्रींवर कराच्या असमानतेवर नाराजी व्यक्त केली आहे. कीटकनाशकांवर जीएसटी दर कमी केला जाऊ शकेल यासाठी समितीने रसायन आणि खत विभागाने या प्रकरणात तत्काळ कार्यवाही करण्यास सांगितले होते.
स्थायी समितीने आपल्या अहवालात नमूद केले की, कीटकनाशकांवरील जीएसटी १८ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. खतांवर हा केवळ ५ टक्के आहे. जवळपास ९०,००० कोटी रुपयांचे पीक कीटकांमुळे दरवर्षी नष्ट होते. कीटकनाशकही कृषीशी संबंधित सामग्री आहे, त्यामुळे कीटकनाशकांवर जीएसटीचा दर सध्याच्या १८ वरून घटवून ५ टक्के केला पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा हाऊ शकेल आणि कृषी उत्पादनात वाढ होऊ शकेल.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार उचलणार ‘ते’ पाऊल; बघा, नेमकं काय म्हणालेत अशोक चव्हाण
- कोलकाताच्या ‘या’ दुकानात 1 चहा मिळतोय हजार रुपयाला; जाणून घ्या काय आहे या चहाची खासियत
- अर्थसंकल्पानंतर ‘या’ शेअर्सने भरले गुंतवणुकदारांचे खिसे; एका महिन्यात दिला तब्बल 150% परतावा
- रॉम्पस+ ईव्ही स्कूटर या पॉवरफुल सायकलबद्दल आहे का तुम्हाला ‘ही’ माहिती; वाचा की मग महत्वाची माहिती
- म्हणून ‘त्यावेळी’ तपासली होती युवराजची बॅट; पहा कोणी आणि का केले होते असे कृत्य