Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ आरोपांना अखेर टिकैतांनी दिले उत्तर; वाचा, खरच आहे का टिकेत यांच्याकडे करोडोंची संपत्ती आणि मॉल

दिल्ली :

Advertisement

कृषी कायद्यांवरून सुरू झालेले आंदोलन अजूनही थांबलेले नाही. शेतकरी दिवसेंदिवस अधिकच आक्रमक होताना दिसत आहेत. केंद्र सरकारने वेगवेगळ्या मार्गे या आंदोलनात फूट टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र यश काही मिळालं नाही. अशातच आता शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती तसेच त्यांच्याकडे मॉल असल्याचा आरोप केला आहे. 

Advertisement

त्यावर राकेश टिकेत यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, आरोप करणाऱ्यांचा अभ्यास कमी आहे. त्यांनी जास्त अभ्यास करायला हवा. कारण आमच्याकडे खूप संपत्ती आहे. आम्हालाही माहिती नाही की आमच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे. हजारो कोटींची संपत्ती आमच्याकडे आहे. संपत्ती मोजण्यासाठी अनेक मोजदाद करणारे अधिकारी आणि सरकार लावावी लागेल, तेव्हा नेमका आकडा समजेल. 

Advertisement

शेतकरी नेत्यांमध्ये फूट पडली असल्याच्या बातम्याही चालू आहेत. त्यावर पत्रकारांनी विचारले असता टिकेत म्हणाले की, विरोधकांना बोलण्यास आता काहीही उरलेले नाही म्हणून ते आता शेतकरी नेत्यांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

Advertisement

दरम्यान आता आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. किसान महापंचायतच्या माध्यमातून आता राकेश टिकेत यांनी कृषी आंदोलनाची व्याप्तीही वाढविण्याचे ठरवले आहे. 

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply