Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ दोन कंपन्यांवर नाही झाल्या ‘मायक्रोसॉफ्ट’मय; आणखी विस्तारासाठी जोरदार प्रयत्न..!

न्युयॉर्क :

Advertisement

जगभरात टेक्नॉलॉजी सेक्टरमधील दिग्गज कंपनी असेलल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने जगभरात आपली पाळेमुळे आणखी घट्ट करण्यासाठी अनेक कंपन्यांचे अधिग्रहण केले आहे. मात्र, नुकताच आणखी दोन बलाढ्य कंपन्यांचे अधिग्रहण करण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झालेला नाही.

Advertisement

सुप्रसिद्ध उद्योगपती बिल गेटस यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने वेगाने विस्ताराचे धोरण ठेवले आहे. त्यासाठी पाच वर्षांत या कंपनीने ५० पेक्षा जास्त लहान-मोठ्या कंपन्यांचे अधिग्रहण केले आहे. त्यात लिंक्डइन (१.८ लाख कोटी रु.), गिटहब (सुमारे ५४ हजार कोटी रु.) आणि खासगी गेमिंग कंपनी जेनीमॅक्सचा (सुमारे ५४ हजार कोटी रु.) समावेश आहे.

Advertisement

आता त्यात आणखी दोन कंपन्या खिशात घालण्याचे कंपनीचे धोरण होते. पहिली कंपनी म्हणजे टिकटॉक आणि दुसरी आहे पिनट्रेस्ट. मात्र, हे दोन्ही सौदे पूर्णत्वास जाऊ शकलेले नाहीत.

Advertisement

इमेज-शेअरिंग आणि सोशल मीडिया सर्व्हिस कंपनी पिनट्रेस्टची खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. मायक्रोसॉफ्टने पिनट्रेस्टला ऑफर ५,१०० कोटी डॉलरची (सुमारे ३.७० लाख कोटी रु.) होती. मात्र, व्यवहार होऊ शकला नाही. 

Advertisement

वास्तवात मायक्रोसॉफ्ट आपल्या क्लाऊड कॉम्प्युटिंग प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन कम्युनिकेशनचा एक पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी पिनट्रेस्ट खरेदी करू इच्छित आहे. दोन्ही कंपन्यांत कराराबाबतच्या वाटाघाटी बंद झाल्याचे सांगण्यात येते. पिनट्रेस्टने दिलेल्या संकेतानुसार, ते स्वतंत्र कंपनी स्थापन करू इच्छितात असे समजते.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply