Take a fresh look at your lifestyle.

‘तसले’ व्हिडिओ बघायला गेल्यावर आता थेट पोलिसांना जाणार १०९० वर मेसेज; वाचा कशी चालणार ‘ही’ यंत्रणा

दिल्ली :

Advertisement

तंत्रज्ञानाच्या मदतीने सध्या अनेक मोठ्या मोठ्या घटना टाळता येणे शक्य झाले आहे. याच तंत्रज्ञांनाचा उपयोग करून सध्या सरकार आणि पोलिस महिलांसोबत गैरव्यवहार करणाऱ्यांना लगाम लावणार आहेत.

Advertisement

उत्तर प्रदेश पोलीस आणि सरकारने एक मोठे पाऊल उचलत आता महिलांसोबत अश्लील कृत्य करणार्‍यांवर आता लक्ष ठेवले जाणार आहे. आता कोणीही पोर्न व्हिडिओ म्हणजेच तसले व्हिडिओ किंवा ऑनलाईन अश्लील बाबी सर्च केल्यास संबंधिता १०९० सावधान होण्याचा अलर्ट देईल. त्यानंतर ही माहिती १०९० वरदेखील दाखल होणार आहे.

Advertisement

 एडीजी नीरा रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंटरनेटचा वाढता वापर पाहता १०९० नं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी याच माध्यमाचा वापर केला. उत्तर प्रदेशात डिजिटल चक्रव्ह्यू (महिला सुरक्षेसाठी ३६० डिग्री इकोसिस्टम) साठी एक डिजिटल आऊटरिच रोडमॅप तयार केला आहे.

Advertisement

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, सुरुवातीला पायलट प्रोजेक्ट अंतर्गत राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. यामध्ये चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे. आता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हे सुरू करण्यात येणार आहे. राज्यात जवळपास ११.६ कोटी इंटरनेट युझर्स आहेत. मुख्य रूपानं ते सर्वच १०९० च्या टार्गेटमध्ये आहेत. महिलांच्या फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम आयडीवर सुरक्षेशी निगडीत मेसेज आणि तरूणांना इशारा देणारा मेसेज पाठवण्यात येणार आहे.  

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply