जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा नवा घोटाळा; तब्बल दीड कोटी रूपयांची अफरातफर, वाचा संपूर्ण विषय
चंद्रपूर :
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या ना त्या कारणाने चर्चेत येत असते. आता पुन्हा एकदा या बँकेत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. रोखपाल पदावर कार्यरत असणार्या व्यक्तीने मोठा घोळ घातला आहे.
काही दिवसांपूर्वी याच बँकेचे तत्कालीन अध्यक्ष मनोहर पाऊणकर हेही तुरुंगात होते. त्यावेळीही मोठे भ्रष्टाचार प्रकरण झाले होते. या प्रकरणात बँकेला नाहक बदनामी सहन करावी लागली होती. या प्रकरणाला उलटून 4 महिनेही झालेले नसताना हा नवा घोटाळा समोर आला आहे.
रोखपाल पदावर असलेल्या व्यक्तीने ग्राहकांची फसवणूक केली असल्याची माहिती देण्यात आली असून ग्राहकांनी दिलेले पैसे अकाउंटला न टाकता स्वतः खिशात टाकले. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. या घटनेमुळे आता ग्राहकांमध्ये खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.
याच पध्दतीने किती ग्राहकांना फसवले गेले याचा तपशील चौकशीत पुढे येणार आहे. बँकेच्या या घोटाळ्यामुळे ग्राहकांना त्यांचे पैसे सुरक्षित की बुडाले अशी शंका आहे.
बँकेशी संलग्न एका सहकारी सोसायटीने या शाखेत भरायला दिलेली मोठी रक्कम खात्यात जमा न झाल्याने घोटाळ्याचे हे बिंग फुटले. काल रात्रभर बँकेच्या पथकाने या शाखेत चौकशी चालू आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : कांद्याच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय दर
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6400 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,300 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : पुण्यात द्राक्षाला 9000 भाव; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट