Take a fresh look at your lifestyle.

आता जुन्या ट्रॅक्टरमध्येही बसवता येणार सीएनजी किट; वाचा, किती आणि कसा होणार फायदा

मुंबई :

Advertisement

सध्या ईलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांची चलती आहे. जगभरात आता पेट्रोल आणि डिझेलपेक्षा सीएनजी वाहनांना मागणी आहे. प्रदूषण टाळता यावे आणि लोकांचा खर्च कमी व्हावा, या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारही मोठी योजना आखत आहे.

Advertisement

केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते काल सीएनजी ट्रॅक्टरचे लोकार्पण करण्यात आलं. सीएनजी ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे आता शेतकरी जुन्या ट्रॅक्टरमध्येही सीएनजी किट बसवू शकतील. याबाबत सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाईल, असंसुद्धा केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणालेत. 

Advertisement

आता १५ वर्षांपूर्वीच्या वाहनांना स्क्राप करण्यात येणार आहे. तर पेट्रोल डीझेल ऐवजी सीएनजी वर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्यावर सरकारकडून भर देण्यात येत आहे. शेतीची मशागत करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरला देखील मोठ्या प्रमाणात इंधन लागते.

Advertisement

देशातील जवळपास 60 टक्के कार, ट्रक, बस आणि ट्रॅक्टर डिझेलवर चालतात. वापरल्या गेलेल्या एकूण डिझेलपैकी 13 टक्के ट्रॅक्टर, शेतीविषयक उपकरणे आणि पंपसेट इत्यादींमध्ये वापरली जातात.

Advertisement

डिझेल वाहन 7-8 पेट्रोल वाहनांएवढे प्रदूषण पसरवते. म्हणजेच ट्रॅक्टर 7-8 पेट्रोल कार इतके किंवा जास्त प्रदूषण पसरवितो, कारण ट्रॅक्टरमध्ये कारपेक्षा अधिक शक्ती असते. सीएनजीवर ट्रॅक्टर चालविण्यासाठी 4 तासांत सुमारे 180 रुपये खर्च अपेक्षित आहे.

Advertisement

एका अंदाजानुसार शेतकऱ्यांना वर्षाकाठी 1 लाख रुपयांचा फायदा होऊ शकतो. रस्ते वाहतूक मंत्रालयाने सीएनजी ट्रॅक्टरचे मानक निश्चित केलेत. त्यानुसार बाजारपेठेत हे ट्रॅक्टर उपलब्ध असतील.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply