Take a fresh look at your lifestyle.

निवडणूक चिन्ह आणि लढतीही फायनल; पहा नेमके काय असणार लढतीचे चित्र

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा बँकेच्या चार जागांसाठी पुढील आठवड्यात २० फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. ४ जागांसाठी ८ उमेदवार रिंगणात आहेत.

Advertisement

त्यांचे निवडणूक चिन्ह आणि लढती आता फायनल झालेल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी चिन्हवाटप यादी जाहीर केली आहे.

Advertisement

सोसायटी मतदारसंघातील नगर तालुक्यातील उमेदवार ज्येष्ठ संचालक शिवाजी कर्डिले यांना कपबशी चिन्ह मिळाले आहे.तर, त्यांच्या विरोधी असलेल्या उमेदवार सत्यभामाबाई भगवान बेरड यांना छत्री चिन्हे मिळाले आहे.

Advertisement

कर्जतमधील अंबादास पिसाळ यांना विमान व मिनाक्षी साळुंके यांना कपबशी हे चिन्ह आहे. येथील निवडणूक म्हणजे माजी मंत्री राम शिंदे व आमदार रोहित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे.

Advertisement

पारनेर सोसायटीच्या जागेसाठी उमेदवार व संचालक उदय शेळके यांना कपबशी चिन्ह आहे. त्यांना शिवसेना नेते रामदास भोसले यांच्या विमान चिन्हाचे कडवे आव्हान आहे.

Advertisement

तर, बिगरशेती संस्था मतदारसंघातील प्रशांत सबाजीराव गायकवाड यांना कपबशी व दत्तात्रय पानसरे यांना विमान चिन्ह मिळाले आहे. या जागेवरही चुरशीची लढत होत आहे.

Advertisement

जिल्हा बँकेच्या बँकेच्या सर्व २१ जागा बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू होत्या. परंतु, चार जागांवर तोडगा निघू न शकल्याने त्यासाठी २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. यात कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply