Take a fresh look at your lifestyle.

सलग पाचव्या दिवशीही उडाला इंधन भडका; वाचा, काय आहेत ताजे दर

दिल्ली :

Advertisement

देशात सध्या इंधन दराचा आगडोंब उसळला आहे. साधारणपणे लॉकडाउनपासून इंधन दर वाढण्यास सुरूवात झाली होती. अजूनही इंधन दरात वाढ होतच आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढत्या किंमती आता सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी बनल्या आहेत. देशातील पेट्रोल प्रतिलिटर 98 रुपयांच्या पुढे गेले आहे. त्याचबरोबर दिल्ली आणि मुंबईसह बर्‍याच मेट्रो शहरांमध्ये इंधनांच्या किंमत आतापर्यंतच्या उच्चांकी स्तरावर गेलेल्या आहेत.

Advertisement

मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर ९५ रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत. कच्च्या तेलाच्या किंमतीत आणखी वाढ झाल्यास पेट्रोलची किंमत प्रतिलिटर १०० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल ९५ रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. तर चेन्नईत ९१ रुपये आणि बंगळुरुत ९२ रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे.

Advertisement

आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा भाव ९४.९३ रुपये झाला आहे. मुंबईत एक लीटर डिझेलसाठी ग्राहकांना आता ८५.७० रुपये मोजावे लागतील. नांदेडमध्ये ९६.८७ रुपये आहे. शुक्रवारी येथे पेट्रोल ९८.०७ रुपये झाले होते. तर परभणीमध्ये सर्वाधिक ९७.०६ रुपये आहे. परभणीत एक लिटर डिझेलचा भाव ८६.४५ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ८८.४४ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ७८.७४ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९०.७० रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८३.९६ रुपये भाव आहे.कोलकात्यात आज पेट्रोल ८९.७३ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८२.३३ रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ९१.४० रुपये असून डिझेल ८३.४३ रुपये झाला आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply