Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक : आंदोलनाला पुन्हा लागले हिंसात्मक वळण; आंदोलकांनी थेट ‘त्यांच्यावरच’ केला हल्ला, वाचा, नेमकी काय घडली घटना

दिल्ली :

Advertisement

शुक्रवारी दिल्लीच्या टिकेरी सीमेवर आंदोलकांच्या जमावाने एका पोलिस कर्मचार्‍यावर हल्ला केला. टिकेरी सीमेवरील नांगलोई पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राणा हे बेपत्ता झालेल्या प्रदर्शनकारी लोकांचे पोस्टर्स लावण्यासाठी आंदोलनस्थळी गेले होते. त्यावेळी त्यांना काठी आणि दांड्यांनी मारहाण करण्यात आली. सदर वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

Advertisement

या मारहाणीत पोलिस कर्मचारी जितेंद्र यांच्या डोक्यावर अनेक टाके पडले आहेत. जखमी पोलिस कर्मचार्‍याला रुग्णालयात नेण्यात आले असून आता याप्रकरणी पोलिस एफआयआर नोंदवित आहेत.

Advertisement

26 जानेवारी रोजी शेतकरी संघटनांनी नवीन कृषी कायद्यांचा निषेध करण्यासाठी ट्रॅक्टर रॅली आयोजित केली होती. या रॅलीतही बराच हिंसाचार झाला होता. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 121 लोकांना अटक केली आहे.जे तिहार तुरूंगात बंद आहेत.

Advertisement

आता या हिंसेमुळे वातावरण अधिकच तापू शकते. दिवसेंदिवस आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत. सरकार यावर अजूनही तोडगा काढायला तयार नसल्याने आंदोलकांचा अंत बघण्याचे काम सुरू असल्याची टीका आंदोलक समर्थकांनी केली आहे.

Advertisement

दरम्यान राकेश टीकेत यांनी आता किसान महापंचायत देशभरात नेण्याची मोहीम आखली आहे. ज्यामुळे आता शेतकरी आंदोलांची व्याप्ती अधिकच वाढणार आहे. महाराष्ट्रातही राकेश टीकेत लवकरच हुंकार भरणार आहेत.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply