Take a fresh look at your lifestyle.

म्हणून राजेंद्र नागवडेंच्या विरोधात स्वकीयांचा एल्गार; पहा नेमके काय कारण घडलेय

अहमदनगर :

Advertisement

जिल्ह्याच्या सहकाराच्या राजकारणात मातब्बर कुटुंबीय म्हणून दिवंगत काँग्रेस नेते शिवाजीराव (बापू) नागवडे यांच्या कुटुंबियांची ओळख आहे. मात्र, आता त्यांचे पुत्र राजेंद्र नागवडे हे सहकार मोडीत काढण्यासह शेतकऱ्यांना मतदानापासून वंचित ठेवत असल्याचा गंभीर आरोप स्वपक्षीयांनी केला आहे.

Advertisement

नागवडे कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. कारखान्याचे सभासद व सेवा संस्थेच्या प्रतिनिधींची मढेवडगाव येथे बैठक झाली. माजी उपाध्यक्ष जिजाबापू शिंदे यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले, अण्णासाहेब शेलार, जिल्हा बँकचे संचालक दत्तात्रय पानसरे, टिळक भोस, पंचायत समिती सदस्य जिजाबापू शिंदे, संजय जामदार, प्रा. तुकाराम दरेकर, लक्ष्मण नलगे, अॅड. बाळासाहेब काकडे आदींसह नागवडे कारखान्याचे सभासद उपस्थित होते.

Advertisement

शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर यांनी यावेळी राजेंद्र नागवडे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.  कारखान्याचे सभासद व सेवा संस्थेच्या प्रतिनिधींना निवडणुकीपासून वंचित ठेवण्याचा कुटिल डाव अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचा असून साखर सहसंचालकाकडे याविरोधात दाद मागितली आहे. तेथे न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात दाद णार असल्याचे मगर यांनी म्हटले आहे.

Advertisement

मगर यांनी पुढे म्हटले की, कारखान्याच्या २३ हजारपैकी १३ हजार सभासदांना अपात्र ठरवले गेले आहे. ४३ पैकी ३३ सेवा संस्थांना अपात्र ठरवले आहे. कारखाना प्रशासनाने सूडबुद्धीने घेतलेल्या या निर्णयाविरोधात साखर आयुक्तांकडे दाद मागितली आहे. 

Advertisement

सभासदांना प्रतिवर्षी ३१ मार्च ते ३० एप्रिलपर्यंत रजिस्टर पोस्टाने किंवा पत्राने कारखान्याला ऊस आला नाही, कारखान्याच्या मिटींगला आला नाहीत अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारची नोटीस न काढता पाच वर्षांत नियमांची पायमल्ली करत १३ हजार सभासदांना व ३३ सेवा संस्था प्रतिनिधींना मतदान प्रक्रियेपासून वंचित ठेवण्याचे पाप केले आहे, असे मगर म्हणाले आहेत.

Advertisement

मी शिवाजीराव नागवडे यांच्याबरोबर ४० वर्षे राहिलो. मी भाजपत गेलो नाही. मी बापूंच्या विचाराचा आहे. सहकार टिकला पाहिजे. बापूंचा खासगीकरणाला विरोध होता. सहकारी साखर कारखाना हा शेतकरी सभासदांच्या मालकीचा असून त्यांनाच मतदानापासून वंचित ठेवणे हे सर्वात मोठे पाप राजेंद्र नागवडे यांनी केले आहे, असेही मगर यांनी सांगितले आहे.

Advertisement

कारखान्याचे अध्यक्ष स्वार्थासाठी पक्ष बदलतात. परभणी व सांगली येथे घेतलेल्या कारखान्यांच्या मागे ईडीची पीडा लागू नये, म्हणून ते भाजपमध्ये गेले, याची आठवण त्यांनी करून दिली आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply