अखेर राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या घरावरही चालवला जेसीबी; वाचा, काय घडला प्रकार
बक्सर :
जनता दल युनायटेड (जेडीयू) चे माजी उपाध्यक्ष आणि राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर जे एकेकाळी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे अगदी जवळचे होते, आता त्यांच्यातील दुरावाही वाढला आहे. परिणामी प्रशांत किशोर घरावरही जेसीबी चालवला गेला आहे.
शुक्रवारी अहिरुलीजवळ राष्ट्रीय महामार्ग-84 च्या बाजूने प्रशांत किशोर यांच्या घरावर प्रशासनाचा जेसीबी चालू झाला. जेसीबीचा आवाज होताच लोक उत्सुकतेने जमा झाले. जेसीबीने सुमारे 10 मिनिटांत त्यांच्या घराची सीमा व दरवाजा उखाडला. विशेष म्हणजे कोणीही याला विरोध देखील केला नाही, अर्थात हे काही राजकीय प्रकरण नव्हते.
वास्तविक पाहता राष्ट्रीय महामार्ग-84 चे रुंदीकरणाच्या वेळी ताब्यात घेतलेली जमीन रिकामी करण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने मोहीम राबविली जात आहे. यातच प्रशांत किशोर यांच्या वडिलोपार्जित घराची सीमा तुटली.
हे घर त्यांचे वडील दिवंगत डॉ श्रीकांत पांडे यांनी बनवले होते. परंतु प्रशांत किशोर सध्या येथे राहत नाहीत. प्रशासकीय सूत्रांच्या माहितीनुसार, एनएच-84 च्या रुंदीकरणाच्या वेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ताब्यात घेतलेल्या वडिलोपार्जित घराच्या या जागेची भरपाई प्रशांत किशोर यांनी अद्याप घेतलेली नाही.
मूळचे बक्सर असलेले प्रशांत किशोर यांनी आपल्या रणनीतिक बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक राजकारण्यांना मुख्यमंत्री बनवले आहे. 2015 मध्ये त्यांनी नितीशकुमार यांना निवडणूक जिंकण्यास मदत केली आणि परिणामी त्यांना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष करण्यात आले. नंतर प्रशांत किशोर यांनाही कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला पण नंतरच्या काळात एनआरसीच्या मुद्दय़ावरून त्यांच्यात आणि मुख्यमंत्र्यांमध्ये अंतर वाढले होते.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- ‘त्या’ लोकप्रिय अॅपद्वारे घुसतोय मालवेअर; पहा कोणती आहेत धोकादायक अॅप्लिकेशन
- बाजारभाव अपडेट : नाशकात टोमॅटो जोरात; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : ‘त्या’ठिकाणी हरभरा 7,000 वर; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : तूर 7,000 च्या पार; वाचा राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : पुण्यात ज्वारी 5000 ने; पहा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट