Take a fresh look at your lifestyle.

श्रीगोंदा कारखान्यातून दिले ‘सांगली-परभणी’चे पगार; नागवडे यांच्यावर मगर यांनी केले गंभीर आरोप

अहमदनगर :

Advertisement

जिल्ह्यातील एक जबाबदार कारखाना म्हणून ओळख असलेल्या श्रीगोंदा येथील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे पैसे थेट खासगी कारखान्यातील पगार देण्यासाठी वापरल्याचा गंभीर आणि धक्कादायक आरोप कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर यांनी केला आहे.

Advertisement

नागवडे कारखान्याच्या बैठकीत बोलताना मगर यांनी अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न केले आहेत. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, जिल्हा बँकचे संचालक दत्तात्रय पानसरे, टिळक भोस यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी पंचायत समिती सदस्य जिजाबापू शिंदे, संजय जामदार, प्रा. तुकाराम दरेकर, लक्ष्मण नलगे, अॅड. बाळासाहेब काकडे आदींसह नागवडे कारखान्याचे सभासद उपस्थित होते.

Advertisement

मगर यांनी म्हटले आहे की, मागील वर्षी तालुक्यात ऊस असतानाही सहकारी साखर कारखाना बंद ठेवून अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी स्वतःच्या मालकीच्या सांगली व परभणी जिल्ह्यातील खासगी कारखान्याला श्रीगोंदे कारखान्यातून पगार दिला. याची चौकशी झाली पाहिजे.

Advertisement

तसेच ते पुढे म्हणाले की, कारखान्याचे सभासद व सेवा संस्थेच्या प्रतिनिधींना निवडणुकीपासून वंचित ठेवण्याचा कुटिल डाव अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचा असून साखर सहसंचालकाकडे याविरोधात दाद मागितली आहे. तेथे न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात दाद मागू.

Advertisement

कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. कारखान्याचे सभासद व सेवा संस्थेच्या प्रतिनिधींची मढेवडगाव येथे माजी उपाध्यक्ष जिजाबापू शिंदे यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीत मगर बोलत होते.

Advertisement

संपादन : सचिन पाटील  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply