औरंगाबाद / बीड :
बीड जिल्ह्यातील परळी येथील पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येचे प्रकरण आता राज्यात तापले आहे. या तरुणीच्या कथित ध्वनिफिती राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांना शुक्रवारी सादर केल्या आहेत.
२२ वर्षीय पूजा चव्हाण या तरुणीने दोन दिवसांपूर्वी पुण्यातील वानवडी भागात आत्महत्या केली. त्यानंतर मयत पूजा ज्या व्यक्तीशी बोलत होत्या त्या अनेक ध्वनीफिती समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या आहेत.
या आत्महत्येस महाराष्ट्र विकास आघाडी सरकारातील एक कॅबिनेट मंत्री जबाबदार असल्याची चर्चा आहे. समाजमाध्यमांवर ध्वनीचित्रफीत टाकली असून पूजाची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे.
पूजा चव्हाण आत्महत्येस जबाबदार राज्य सरकारमधील ‘त्या’ मंत्र्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी वाघ यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. राजकीय पक्षांना दुसरे काही काम नसल्याने या प्रकरणावरून ते वादंग निर्माण करत आहेत. मंत्री धनंजय मुंडेंवरही आरोप झाले. नंतर सत्य सर्वांसमोर आले.
फडणवीस यांनी म्हटले आहे की, पोलिस महासंचालक यांना दिलेल्या पत्रासमवेत ध्वनीफिती जोडल्या आहेत. या ध्वनीफितीमध्ये पुरुषी आवाज कोणाचा आहे, ती व्यक्ती काय बोलते, या मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीने पूजाला आत्महत्या करण्यास भाग पाडले काय, यासंदर्भात सर्वंकष चौकशी करावी.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- महिला व बालकल्याणाकरिता ‘एवढा’ निधी ठेवण्यात येणार राखीव; पहा, कशी असणार तरतूद
- अभिनेता ऋतिक रोशन अडचणीत; ‘त्याप्रकरणी’ मुंबई क्राईम ब्रांचने धाडले समन्स
- शक्तीप्रदर्शनानंतर फुटला कोविड बॉम्ब; पोहरादेवी महंतांसह आठजण करोनाबाधित
- मोदी तर ‘त्यांच्यापेक्षा’ महान, छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर ‘तेव्हा’ झालाच होता; शिवसेनेने भाजपला करून दिली आठवण
- धक्कादायक : अंबानींच्या घराजवळ जिलेटिनवाली कार; पोलिसांचा तपास सुरू