दिल्ली :
सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर दिल्या जाणाऱ्या फॅमिली पेन्शनची कमाल मर्यादा वाढवण्याचा महत्वाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने घेतला आहे. फॅमिली पेन्शनची कमाल मर्यादा अडीच पटींपेक्षा जास्त वाढवण्यात आलेली आहे.
सध्या ही मर्यादा कमाल ४५ हजार रुपये आहे. त्यात वाढ करून आता ती १.२५ लाख रुपये करण्यात आलेली आहे. केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी याची माहिती दली आहे.
ते म्हणाले आहेत की, या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबातील आश्रित सदस्यांना उदरनिर्वाह करणे सोपे होईल. त्यांना पुरेशी आर्थिक सुरक्षा मिळेल. सध्याच्या नियमांनुसार एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना किंवा निवृत्तीनंतर मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जोडीदाराला फॅमिली पेन्शन मिळते.
फॅमिली पेन्शनच्या रकमेच्या २ श्रेणी होत्या. एक कमाल वेतन मर्यादेच्या ५० टक्क्यांची आणि दुसरी ३० टक्क्यांची. सहाव्या वेतन आयोगानुसार आधी ९० हजार रुपये कमाल वेतन मर्यादा होती.
या हिशेबाने ५० टक्के पेन्शनच्या श्रेणीत ४५ हजार व ३०% श्रेणीत मासिक २७ हजार रुपये मिळत असत. आता सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार कमाल वेतन मर्यादा २.५ लाख रुपये केली आहे. त्यामुळे पेन्शन रक्कम ५०% श्रेणीत १.२५ लाख रुपये व ३० % श्रेणीत ७५ हजार रुपये करण्यात आली आहे.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- ‘त्या’ लोकप्रिय अॅपद्वारे घुसतोय मालवेअर; पहा कोणती आहेत धोकादायक अॅप्लिकेशन
- बाजारभाव अपडेट : नाशकात टोमॅटो जोरात; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : ‘त्या’ठिकाणी हरभरा 7,000 वर; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : तूर 7,000 च्या पार; वाचा राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : पुण्यात ज्वारी 5000 ने; पहा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट