Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. भयंकरच की.. विद्यापीठात पीएचडी १४६ गाईड अपात्र..!

औरंगाबाद :

Advertisement

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संबंधित ही धक्कादायक आणि शिक्षण क्षेत्राच्या एकूण विश्वासार्हतेवर प्रश्नांची सरबत्ती करायला लावणारी बातमी आहे. कारण, येथील निम्म्यापेक्षा अधिक पीएचडी गाइड अपात्र असल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement

चारही विद्याशाखांमध्ये २६२ पैकी ११३ गाइड पात्र आहेत. त्याचवेळी १४६ गाइडनी पात्रतेचे निकषच पूर्ण केलेले नाहीत. गाइडशिपचे निकष पडताळणीसाठी स्थापित समितीच्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे, असे दिव्य मराठीच्या बातमीत म्हटलेले आहे.

Advertisement

महाविद्यालयात पीजी अभ्यासक्रम नसणे, विद्यापीठात मान्यताप्राप्त पीजी टीचर्स नसणे आणि महाविद्यालयात संशोधन केंद्र नसणाऱ्या प्राध्यापकांकडे गाइडशिप असेल तर त्यांना विद्यापीठ प्रशासन संशोधक विद्यार्थीच देणार नाही, अशी भूमिका कुलगुरूंनी घेतली होती.

Advertisement

त्यानंतर १३ सप्टेंबर २०१९ रोजी सत्यशोधन समितीची स्थापना करण्यात आली. समितीच्या अहवालातून ही माहिती स्पष्ट झाली. ज्यातून हे धक्कादायक निष्कर्ष बाहेर आलेले आहेत.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply