आरक्षणात असे असणार रोटेशन; पहा कोणता महत्वाचा निर्णय घेणार आहेत योगी सरकार
दिल्ली :
उत्तरप्रदेश राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत राज निवडणुकीसाठी आरक्षण पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सध्या याचे धोरण आणि मसुदा तयार करीत आहेत. त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
त्यानुसार यापूर्वी कधीही आरक्षित न झालेल्या जागांवर प्राधान्याने आरक्षण टाकले जाणार आहे. त्याद्वारे लोकशाही प्रक्रियेमध्ये महिला, मागास घटक आणि वंचितांना संधी देण्याचा राज्य सरकारचा हा प्रयत्न आहे.
असे असणार रिझर्वेशन रोटेशन :
१. अनुसूचित जमाती महिला
२. अनुसूचित जमाती
३. अनुसूचित जातीच्या महिला
४. अनुसूचित जाती
५. ओबीसी महिला
६. ओबीसी
७. महिला
उत्तरप्रदेश राज्यात इतक्या जागांवर होतात निवडणूक :
58,194 : ग्राम प्रधान (सरपंच)
7,31,813 : ग्रामपंचायत सदस्य
75,805 : क्षेत्र पंचायत सदस्य (पंचायत समिती)
3,051 : जिल्हा पंचायत सदस्य (जिल्हा परिषद)
संपादन : माधुरी सचिन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- ..आणि ‘त्या’ नेत्यांसह केंद्रप्रमुखांचा अर्थपूर्ण प्रयत्न फसला; शिक्षकांच्या सतर्कतेचा परिणाम..!
- आणि त्यांनी थेट डॉक्टरांच्या नावानेच मागितले कर्ज; पहा कुठे उघडकीस आला लाखोंचा कर्जघोटाळा..!
- म्हणून अजित पवारांनी दिली वीजबिल वसुलीस स्थगिती; पहा कोणापुढे वरमले ठाकरे सरकार
- फडणविसांनी विधिमंडळात मांडले ‘हे’ महत्वाचे मुद्दे; पहा नेमके कशावर काय म्हटलेय त्यांनी
- फडणवीसांच्या ‘जलयुक्त’ची चौकशी जोरात; पहा कुठे होत आहे आढावा बैठक