अरुण गवळीच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट समोर; 2 दिवसांपूर्वी आली होती कोरोनाची चाचणी पॉझीटीव्ह
नागपुर :
गेल्या 2 दिवसांपासून कुख्यात गुंड अरुण गवळीची कोरोना चाचणी पॉझीटीव्ह आल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र त्याच्या प्रकृतीविषयी अद्याप कोणतीही विशेष माहिती समोर आलेली नव्हती. सुरूवातीला गवळीची प्रकृती खालावलेली होती. मात्र आताच मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे.
गवळीसह त्याच्यासोबत असणार्या इतर 5 कैद्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. करोनाबाधित बंदीवानांमध्ये कुख्यात शेखूचाही समावेश असून अन्य तिघे कच्चे कैदी आहेत. आता त्यांना वेगवेगळे ठेवण्यात आले असून आता त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
या पाचही जणांच्या शरिरातील ऑक्सिजनची पातळी तसेच अन्य काही चाचण्या करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय अहवालाच्या माहितीनुसार, आता या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे सर्वांना पुन्हा कारागृहात परत पाठविण्यात आले आहे. पाचही जणांचे कारागृहात वेगवेगळ्या बॅरेकमध्ये विलगीकरण करण्यात आलेले आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- ‘त्या’ शिक्षक, कर्मचाऱ्यांना खुशखबर; वेतन आयोगाबाबत सरकारने केली मोठी घोषणा
- पुन्हा मिळणार नाही सोने खरेदीची ही संधी; सलग आठव्या दिवशी सोन्याच्या दरात ‘एवढी’ घसरण, वाचा ताजे भाव
- देशात पहिल्यांदाच सुरू झालीय गाढवाच्या दुधाची डेअरी; दूध विकले जातेय ‘एवढ्या’ किमतीला; वाचा, भन्नाट स्टोरी
- दूध पिताना ‘या’ नक्कीच गोष्टी ठेवा लक्षात; अन्यथा…
- घर खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी : ‘या’ 2 बँकांनी दिलीय गुड न्यूज