दिल्ली :
आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एमडी असलेल्या चंदा कोचर यांना पीएमएलए (मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक) विशेष न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. आज 12 फेब्रुवारी रोजी सकाळी बँकेचे माजी एमडी आणि सीईओ सुनावणीसाठी मुंबई सत्र न्यायालयात हजर झाले. सुनावणीनंतर विशेष पीएमएलए कोर्टाने चंदा कोचर यांना जामीन मंजूर केला.
कोचर यांना कोर्टाने 5 लाखांच्या बॉन्डवर जामीन मंजूर केला. याशिवाय कोर्टाच्या मान्यतेशिवाय त्यांना देश न सोडण्यास सांगण्यात आले आहे. आयसीआयसीआय बँक-व्हिडिओकॉन मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील सुनावणीदरम्यान चंदा कोचर यांना विशेष पीएमएलए कोर्टाकडून जामीन मिळाला.
असे आहे पूर्ण प्रकरण :-
ईडीचा आरोप आहे की, चंदा कोचर यांच्या अध्यक्षतेखालील आयसीआयसी बँकेच्या समितीने व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला दिलेल्या 300 कोटी कर्जांपैकी 64 कोटी रुपयांचे कर्ज न्युपॉवर रिन्यूव्हेबल्स प्रायव्हेट लिमिटेड (Nupower Renewables Pvt Ltd) कडे हस्तांतरित केले गेले आहे.
व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजला कर्ज दिल्यानंतर एक दिवसानंतर 8 सप्टेंबर 2009 रोजी ही रक्कम एनआरपीएलकडे वर्ग करण्यात आली. एनआरपीएल ही दीपक कोचर यांची एक कंपनी आहे. ईडीच्या आरोपपत्राची दखल घेत विशेष पीएमएलए कोर्टाच्या न्यायाधीशांनी चंदा कोचर यांना आपल्या पदाचा गैरवापर केल्याबद्दल दोषी मानले.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- देशात पहिल्यांदाच सुरू झालीय गाढवाच्या दुधाची डेअरी; दूध विकले जातेय ‘एवढ्या’ किमतीला; वाचा, भन्नाट स्टोरी
- दूध पिताना ‘या’ नक्कीच गोष्टी ठेवा लक्षात; अन्यथा…
- घर खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी : ‘या’ 2 बँकांनी दिलीय गुड न्यूज
- म्हणून झाली सरावासराव सुरू; पहा नेमके काय म्हटलेय सभापती दातेंनी
- तर ‘त्या’ बोअरवेल चालक-मालकांवर होणार कारवाई; पहा नेमका काय झालाय निर्णय