Take a fresh look at your lifestyle.

मोदींच्या त्या’ निर्णयामुळे 40 टक्के होणार बेरोजगार; राहुल गांधींचा घणाघात

दिल्ली :

Advertisement

काँग्रेस नेते राहुल गांधी शुक्रवारी दोन दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी कृषी सुधारणा विधेयकाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे.

Advertisement

हनुमानगढच्या पीलीबंगामध्ये शेतकरी महापंचायतेला संबोधित करताना त्यांनी म्हटले आहे की, तिन्ही कृषी कायदे केवळ शेतकरी नाही, तर भारतातील 40 टक्के लोकांवर हल्ला आहे. आपण हे रद्द करणारच आहोत.

Advertisement

त्यांनी म्हटले की, शेती हा  जगातील सर्वात मोठा बिझनेस आहे, कारण यामुळे कोट्यावधी लोकांना भोजन मिळते. शेतकरी, मजूर, छोटे दुकानदार, व्यापाऱ्यांचा या व्यवसायाशी थेट संबंध आहे.

Advertisement

सध्या या व्यवसायाशी निगडीत 40% लोकांचा व्यवसाय 2-3 कॉर्पोरेट लोकांच्या हातात जावा हा सरकारचा हेतू आहे. एकाच कंपनीने संपूर्ण देशाचे धान्य, फळ-भाज्या विकाव्या. जर असे झाले तर आज जे लोक भाजी, भुईमुग, हरबरा विकतात त्यांचे काय होईल. जे आज छोटे व्यापारी आहेत, त्यांचे काय होईल, असेही गांधी यांनी म्हटले आहे.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी रोज काहीना काही नवीन कारण शोधतात. कारण बेरोजगारी वाढत आहे. तसेच अनेक समस्या देशासमोर आहेत. मात्र, त्यावर ते अजिबात बोलत नसल्याचा पुनरुच्चार गांधी यांनी केला आहे.

Advertisement

23 मिनिटांच्या भाषणात राहुल गांधींनी 7 वेळा शेतकऱ्यांसोबत मजूर, छोट्या दुकानदारांचे नाव घेतले, 12 वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख केला.

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply