Take a fresh look at your lifestyle.

त्यामुळे दुधाला मिळणार रु. 30 / लीटर भाव; हजारो शेतकऱ्यांना होणार फायदा

अहमदनगर :

Advertisement

दुधाच्या किमतीत प्रति लिटर किमान एक रुपया वाढ करण्याची घोषणा लॅक्टॅलीसने केली आहे. त्यामुळे नगर, पुणे व नाशिक जिल्ह्यातील सुमारे 50 हजार शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

Advertisement

या निर्णयामुळे आता अाता उच्च गुणवत्तेच्या दुधासाठी प्रतिलिटर ३० रुपयांपेक्षा जास्त दर उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल. लॅक्टॅलीस कंपनी महाराष्ट्रात सनफ्रेश अॅग्रो इंडस्ट्रीज (प्रभातची मालकी) या नावाने कार्यरत अाहे.

Advertisement

सनफ्रेशअॅग्रो- लॅक्टॅलीसचे सीईओ राजीव मित्रा यांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, दुध उत्पादनातील महत्त्वाचा घटक असलेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. गुणवत्ता, वेळेत पैसे देणे, पशुखाद्य आणि खनिज मिश्रणावर अनुदान, पशुवैद्यकीय सेवा आणि प्रशिक्षण, बिनव्याजी कर्ज मिळविण्यासाठी मदत करण्यासह दिवाळी बोनस असे लाभ कंपनी त्यांना देत अाहे.

Advertisement

काेराेनाच्या उद्रेकानंतर दूध खरेदीत झालेल्या घसरणीमुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्याला या दरवाढीमुळे दिलासा मिळाला आहे. उन्हाळ्यात दुभत्या जनावरांची देखभाल करण्यासाठी आणि आपत्कालीन संकटांचा सामना करण्यासाठी कंपनीशी संलग्न असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना या दरवाढीमुळे चांगली अार्थिक मदत मिळणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply