Take a fresh look at your lifestyle.

मोदींच्या कृषी विधेयकाच्या 3 कायद्यांमध्ये आहे ‘हे’; नेमके मुद्दे सांगितले राहुल गांधींनी

दिल्ली :

Advertisement

काँग्रेस नेते राहुल गांधी शुक्रवारी दोन दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर असून त्यांनी हनुमानगढच्या पीलीबंगामध्ये शेतकरी महापंचायतेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृषी सुधारणा विधेयकावर हल्लाबोल केला आहे.

Advertisement

यातील 3 विधेयकांबद्दल बोलताना त्यांनी याची सध्या आणि सोप्या भाषेत फोड करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तिन्ही कृषी कायदे केवळ शेतकरी नाही, तर भारतातील 40 टक्के लोकांवर हल्ला आहे. आपण हे रद्द अशी घोषणा त्यांनी पुन्हा एकदा केली आहे.

Advertisement

राहुल गांधी यांनी कायद्याबाबत म्हटले आहे की,

Advertisement

पहिला कायदा म्हणजे देशातील कोणत्याही शेतकऱ्यांकडून एकादी व्यक्ती अमर्याद धान्य खरेदी करु शकते. जर असेल झाले तर मग बाजार समित्या व विक्री ठिकाणांची आवश्यकता राहणार नाही. म्हणजेच हा कायदा मार्केट यार्डला संपवण्याचा कायदा आहे.

Advertisement

दुसरा कायदा सांगतो की, एखादा उद्योगपती कितीही भाजी, कितीही धान्य आणि फळे साठवून ठेवू शकतो. म्हणजेच ती व्यक्ती संपूर्ण माल स्टोरेज करु शकते. ती व्यक्तीच यावर नियंत्रण मिळवेल. आज धान्य मार्केटमध्ये विकले जाते. कुणीही साठवणूक करत नाही. दुसरा कायदा लागू झाल्याने साठवणूक वाढेल आणि असे देशातील सर्वात श्रीमंत करतील. त्यांना त्यातून भरमसाठ नफा मिळेल.

Advertisement

तर तिसरा कायदा हा जेव्हा शेतकरी त्या उद्योगपतीसमोर जाऊन आपल्या पीकाची योग्य किंमत मागेल आणि ती किंमत न मिळाल्यास तो न्यायालयात जाऊ शकणार नाही याबाबत आहे. हे खूप जाचक ठरणार आहे.

Advertisement

40% लोकांचा व्यवसाय 2-3 लोकांच्या हातात जावा हा सरकारचा हेतू आहे. एकाच कंपनीने संपूर्ण देशाचे धान्य, फळ-भाज्या विकाव्या. जर असे झाले तर आज जे लोक भाजी, भुईमुग, हरबरा विकतात त्यांचे काय होईल. जे आज छोटे व्यापारी आहेत, त्यांचे काय होईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply