Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. लाइफस्टाइल गंडली की; आपण ‘इतके’ तास मोबाईलवर असतोय..!

दिल्ली :

Advertisement

मागील पाच वर्षांत भारतीयांच्या डेटा ट्रॅफिकमध्ये ६० पटीपेक्षा वाढ झालेली असतानाच मोबाईलवर जाणारा वेळही दणक्यात वाढला आहे. मोबाइल ब्रॉडबँड इंडिया ट्रॅफिक (एमबिट) इंडेक्स, २०२१ यांच्या अहवालानुसार आता भारत जगातील अग्रणी देशांमध्ये समाविष्ट झाला आहे.

Advertisement

नोकियाने गुरुवारी याबाबतची आकडेवारी जाहीर केली. एमबिट इंडेक्सनुसार फोरजी डेटा वापरामुळे वर्ष २०२० मध्ये डेटा ट्रॅफिक दरवर्षी ३६% वाढला. यादरम्यान १० कोटी नव्या फोरजी ग्राहकांसह फोरजी ग्राहकां संख्या ७० कोटींवर गेली आहे.

Advertisement

देशात दरमहा डेटा वापर वाढण्याचे एक कारण ग्रामीण भागांत वेगाने वाढणारे नवे यूजर्स आहेत. मोबाइल हँडसेट करमणूक व उत्पादकतेच्या रूपात पुढे आले आहेत. अशावेळी भारतीय माणूस सरासरी पाच तास दररोज मोबाईलवर घालवत आहेत.

Advertisement

गेल्या काही वर्षांदरम्यान परवडणाऱ्या फोरजी हँडसेटच्या पुरवठ्यात वाढ व सरकार डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देणे हे यामागचे कारण आहे. त्यामुळे टेक्नोलॉजी कंपन्या जोमात आहेत.

Advertisement

देशभरात एकूण डेटा ट्रॅफिकमध्ये एकट्या फोरजीचे योगदान ९८.७ टक्के राहिले. फोरजी हँडसेट बाळगणाऱ्यांची संख्या ६०.७ कोटी पार झाली आहे. महत्वाचे म्हणजे महिला आता मोबाईल वापरत असून त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply