मुंबई :
सध्या सोशल मिडीयामध्ये वास्तव बातम्या कमी आणि खोट्या बातम्यांचा प्रचारकी वापर जास्त अशीच परिस्थिती आहे. त्यात भाजप हा केंद्रातील सत्ताधारी आघाडीवर असल्याचे म्हटले जाते. तोच धागा पकडून भाजपला आव्हान देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता खास नियोजन केले आहे.
पटोले यांनी याबाबत म्हटले आहे की, भाजप हा सोशल मीडियाव्दारे विष पेरुन समाजात तेढ निर्माण करत आहे. भाजपच्या विखारी प्रचाराचे उच्चाटन करण्यासाठी राज्यात काँग्रेसचे दोन लाख ‘गांधी’दूत चोख उत्तर देतील.
काँग्रेसच्या सोशल मीडिया मोहिमेचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी म्हटले की, भाजपच्या तावडीतून लोकशाहीला वाचविण्यासाठी काँग्रेसची सोशल मीडिया टीम कार्यरत राहील.
जीव गांधी यांनी देशाला एकविसाव्या शतकात नेण्याचे स्वप्न पाहून आधुनिक तंत्रज्ञान आणले. त्यावेळी हेच भाजपावाले त्याला तीव्र विरोध करत होते, मात्र त्याच तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून भाजपा समाजात खोटी माहिती पसरवून लोकांची दिशाभूल करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
तसेच त्यांनी पुढे सांगितले की, भाजपाकडून केला जात असलेला अपप्रचार काँग्रेस सकारात्मकतेने खोडून काढेल. भाजपा खोटी माहिती पसरवणारी मोठी फॅक्टरी आहे. पण आता याच माध्यमातून भाजपाला काँग्रेसकडून उत्तर मिळेल.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- टोमॅटो बाजारभाव अपडेट : पुण्यात 1500 तर सोलापुरात 400; वाचा, संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : ज्वारीच्या दरातही सलग दुसर्या दिवशी घसरण; पहा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6400 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,050 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : सलग 3 दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण; वाचा, संपूर्ण राज्यातील ताजे मार्केट रेट