Take a fresh look at your lifestyle.

अवघ्या महिनाभरात राम मंदीरासाठी झाला ‘एवढा’ निधी गोळा; आकडा वाचून व्हाल शॉक

मुंबई :

Advertisement

सध्या राममंदीरासाठी निधी गोळा करण्याची मोहीम जोरात सुरू आहे. या मोहिमेसाठी अनेक लोक स्वत:हून मदतीसाठी पुढे आलेले आहेत. आज या मोहिमेला सुरू होऊन तब्बल महिना झाला आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने महिनाभरात देशात किती निधी गोळा झाला आहे, याविषयी माहिती दिली आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, आजवर देशातील लोकांकडून मिळालेल्या निधीचा हिशोब करता महिनाभराच्या आत तब्बल 1 हजार कोटी रूपयांचा निधी जमा झाला आहे. हा जमा झालेला निधी तीन राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये ठेवला जात आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी मंदिर उभारणीसाठी देणगीचा ओघ सुरू असल्याची माहिती दिली. 

Advertisement

स्टेट बॅंक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदामध्ये श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने खाते खोलले आहे. जमा झालेला निधी याच खात्यांमध्ये साठवला जात आहे. निधी जमवण्याची जबाबदारी विश्‍व हिंदू परिषदेच्या (विहिंप) सुमारे दीड लाख कार्यकर्त्यांनी स्वीकारली आहे. 

Advertisement

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले की, बॅंक खात्यांमध्ये आतापर्यंत 1 हजार कोटी रूपयांपेक्षा अधिक निधी जमा झाला आहे. समाजातील सर्व घटक राम मंदिरासाठी योगदान देत आहेत. अगदी दुर्गम खेड्यांतूनही देणगी दिली जात आहे.  

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply