Take a fresh look at your lifestyle.

दुग्धव्यवसाय करताना असे असावे वर्षभराच्या चार्‍याचे नियोजन; वाचा, दुग्धव्यवसायाबाबत नियोजनात्मक माहिती

शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो.

Advertisement

दुग्ध व्यवसाय वर्षभर किफायतशीर पद्धतीने सुरू ठेवण्यासाठी रोजचे दूध संकलन किती हवे, गाई व कालवडींचे प्रमाण किती हवे, या सोबत वर्षभराच्या जनावरांचा चारा आणि त्याचे नियोजन ही बाब लक्षात घेणे महत्वाचे आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की, सकस आहार आणि वर्षभर चारा नियोजन कसे करावे. ज्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहते एवढेच नाही तर दुग्धोत्पादनातही वाढ होते.

Advertisement
  1. दुधाळ जनावरांना मक्‍याचा हिरवा चारा फायदेशीर आहे. मका अतिशय पौष्टिक, पालेदार, सकस आणि उत्पादन खर्च कमी असलेले चारा पीक आहे. मक्‍याची पेरणी ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी.  
  2. ओट हे रब्बी हंगामातील हिरव्या चाऱ्याचे पीक असून ते ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर अखेरपर्यंत घेतले जाते. सर्व जनावारांसाठी हा चारा फायदेशीर आहे.
  3. लसूणघास हा चारा जनावारांसाठी पौष्टिक आणि वाढ होण्यासाठी उपयोगी आहे. याची लागवड ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर दरम्यान केली जाते.
  4. उन्हाळी हंगामात चवळीची लागवड करावी. कमी दिवसांचे असणारे हे चारा पीक मोठ्या झपाट्याने वाढते.
  5. चार्‍यासाठीची ज्वारीचे व्यवस्थापन महत्वाचे असते. हिरवा चारा शिल्लक राहिला तर त्याचा कडबा तयार करता येतो.  

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply