पैदाशीसाठीच्या नराची निवड करताना ‘या’ बाबी घ्या लक्षात; वाचा शेळीपालनातील महत्वाची माहिती
शेळीला भारतात ‘गरीबाची गाय’ म्हणतात आणि कोरड्या जमिनीवर शेती करणायांसाठी हा एक फार महत्वाचा घटक आहे. किरकोळ किंवा चढउतार असलेल्या पृष्ठभागाच्या जमिनी ह्या गाय किंवा इतर प्रकारच्या जनावरांसाठी चांगल्या नसतील, पण शेळी हा उत्तम पर्याय आहे. फार थोडी गुंतवणूक करून शेळी पालन हा किरकोळ आणि लहान शेतकर्यासाठी एक फायदेशीर उद्यम ठरू शकतो.
शेळीपालन करताना पैदाशीसाठीच्या नराची निवड हा फार महत्वाचा मुद्दा आहे. पैदाशीसाठीच्या नराची निवड करताना हे फायदेशीर मुद्दे नक्कीच लक्षात घ्या.
1) नर हा कळपातील सुदृढ आणि जातीचे गुणधर्म दर्शविणारा असावा.
2) पैदाशीचा नर चपळ असावा.
3) पैदाशीचा नर निवडताना दोन जुळ्या नरांतील एक चांगला नर निवडावा, म्हणजे पुढील पिढ्यांत जुळी व तिळी करडे देण्याचे प्रमाण वाढते.
4) पैदाशीच्या नराची प्रजोत्पादन क्षमता चांगली असावी.
5) पैदाशीचा नर उंच, लांब, भरदार छाती असणारा व मानेवर आयाळ असणारा असावा.
6) पैदाशीच्या नरात कोणतेही शारीरिक व्यंग नसावे.
7) पैदाशीचा नर जातिवंत माता-पित्यांपासून झालेला असावा.
8) पैदाशीचा नर निवडताना जातीशी साधर्म्य असणारा, दीड ते दोन वर्षे वयाचा, जुळ्यांतील एक असणारा, सुदृढ, उत्तम प्रजोत्पादन क्षमता असणारा निवडावा, म्हणजे त्याच्यापासून जन्माला येणारी पुढील पिढी चांगल्या गुणवत्तेची होईल.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- चला विकुया : मोदी सरकार ‘या’ क्षेत्रातील शेकडो कंपन्या विकणार, वाचा, कंपन्या विकल्याचा काय होणार फायदा आणि तोटा
- मराठा आरक्षण उपसमितीने घेतला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या तयारीचा आढावा; वाचा, काय आहे परिस्थिती
- आता 7/12 आणि घरावर लागणार पत्नीचे नाव; महिलांनो, तुमच्या फायद्याची ही योजना घ्या समजून
- अवघ्या ६९ रुपयात मिळवा गॅस सिलिंडर; त्यासाठी करावे लागेल ‘हे’ एकच काम
- इंधनदरवाढीने आर्थिक गणित कोलमडले; वाचा, तुमच्या शहरातील आजचे भाव