Take a fresh look at your lifestyle.

‘ती तर आपल्यासाठी अपमानास्पद बाब’ म्हणत पडळकरांनी केला गनिमी कावा; पुन्हा साधला पवारांवर निशाणा

दिल्ली :

Advertisement

शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते अनावरण ही अपमानास्पद बाब आहे. अहिल्यादेवींच्या विचारांच्या उलट शरद पवार यांचं काम आहे. त्यांनी आपले हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लावू नयेत. त्यामुळे युवामित्रांच्या साथीने जेजुरीतील अहिल्यादेवी पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आलो, असे म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

Advertisement

गेल्या काही दिवसांपूर्वी जेजुरी गडावरील अहिल्याबाईंचा पुतळा तयार झाला आहे. कोरोनामुळे या पुतळ्याचे उद्घाटन थांबले होते. या पुतळ्याचे उद्घाटन पवारांच्या हस्ते होणार होते. मात्र त्यापूर्वीच काही मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन पडळकर यांनी घडवून आणले आहे.

Advertisement

पडळकर यांनी केलेला या गनिमी काव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पडळकर हे आक्रमकपणे पवारांना विरोध करत आहेत. आता पवारांवर केलेल्या या टीकेला पवार कसे उत्तर देतात, हे पाहणे महत्वाचे आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply