शेतकर्यांसाठी महत्वाची बातमी; पुन्हा बसू शकतो अवकाळी पावसाचा फटका, वाचा, कुठे आणि कधी होणार पाऊस
दिल्ली :
सध्या कधी ढगाळ तर कधी कडाक्याची थंडी असे वातावरण आहे. या वातावरणाचा फटका द्राक्षसारख्या पिकाला आधीच बसला आहे. अशातच आता पुन्हा एकदा राज्यभरात अवकाळी पावसाची शक्यता सांगितली गेली आहे. यावेळी फक्त राज्यातच नाही तर देशातही अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे.
आधीच बदलत्या वातावरणामुळे अडचणीत आलेल्या शेतकर्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. शेतकरी आणि फळ बागायतदारांना हा अवकाळी पाऊस कदाचित मोठ्या अडचणीत आणू शकतो. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या महितीनुसार, महाराष्ट्रासह देशात 16 ते 20 फेब्रुवारीदरम्यान पाऊस पडेल असा इशारा स्कायमेटनं दिला आहे. या अवकाळी पावसाचा फटका, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओदिशा, झारखंड, छत्तीसगड, कर्नाटकचा अंतर्गत भाग, तेलंगाणा आणि तामिळनाडूला बसणार आहे.
पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड तसेच विदर्भाच्यावर एक चक्रिवादळी हवेचे क्षेत्र विकसित होऊ शकते. त्यामुळे तेलंगाणमधून दक्षिण तामिळनाडूपर्यंत एक ट्रफ विकसित होऊ शकते. या दोन्ही हवामानाच्या परिस्थितीमुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामधून बाष्प भूभागावर येईल त्यामुळे हवामान बिघडून पाऊस पडू शकतो.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : तूर 7,200 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6600 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : कांद्याचे भाव घसरले; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक