Take a fresh look at your lifestyle.

‘बिगरशेती’साठी होणार काटे की टक्कर; पानसरेंना गायकवाडांचे आव्हान

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा सहकारी बँकेच्या 21 पैकी 17 जागा बिनविरोध झालेल्या आहेत. त्यामुळे आता उरलेल्या चार जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाईल. त्यामध्ये सर्वाधिक चुरशीची लढत असणार आहे बिगरशेती जागेसाठी. या जागेसाठी माजी संचालक दत्ता पानसरे  व पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्यात थेट लढत होत आहे.

Advertisement

बिगर शेती मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या महाविकास आघाडीतील पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसह इतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा आपल्या उमेदवारीस पाठिंबा असल्याचा दावा गायकवाड यांनी केला आहे. गायकवाड यांच्यासाठी आमदार अरुण जगताप व संग्राम जगताप यांनी बिगरशेती मतदारसंघातून आपले अर्ज मागे घेतले आहेत.

Advertisement

दरम्यान, कोपरगावमधून विवेक कोल्हे बिनविरोध झाले. या मतदारसंघातून बिपीन कोल्हे, देवेंद्र रोहमारे, किसनराव पाडेकर, अलकादेवी जाधव यांनी अर्ज मागे घेतले. श्रीगोंदे येथे राजेंद्र नागवडे, वैभव पाचपुते, प्रणोती जगताप यांनी अर्ज मागे घेतल्याने माजी आमदार राहुल जगताप बिनविरोध झाले. अकोल्यात राष्ट्रवादीच्या मदतीने बँकेचे विद्यमान अध्यक्ष सीताराम गायकर बिनविरोध झाले आहेत.
तर, नेवासे मतदारसंघाकडे लक्ष लागले होते. अखेरच्या दिवशी शिवाजीराव शिंदे, कारभारी जावळे, रत्नमाला लंघे यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे मंत्री शंकरराव गडाख बिनविरोध झाले. आमदार संग्राम जगताप व आमदार अरूण जगताप यांनी माघार घेतली.

Advertisement

सेवा संस्था मतदारसंघात अंबादास पिसाळ विरूद्ध मिनाक्षी साळुंके (कर्जत), आमदार शिवाजी कर्डिले विरूद्ध सत्यभामाबाई बेरड (नगर), उदय शेळके विरूद्ध रामदास भोसले (पारनेर), प्रशांत गायकवाड विरूद्ध दत्तात्रय पानसरे (बिगरशेती मतदारसंघ) यांच्यात लढत आहे. दरम्यान, पारनेरमधील शेळके यांनी आपण सहज निवडून येऊ, असा दावा केला आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply