Take a fresh look at your lifestyle.

म्हणून पुन्हा घसरणार कांद्याचे दर; वाचा, का होणार दरावर परिणाम

दिल्ली :

Advertisement

सध्या कांद्याच्या दरात वाढ झालेली आहे. अगदी ठोक बाजारातही कांद्याने भाव खाल्ला आहे. आता कांद्याचे भाव अजून वाढण्याची शक्यता सांगितली जात होती. मात्र आता येत्या पंधरा दिवसात नवीन कांदा मार्केटमध्ये दाखल होणार असल्याने कांद्याचे दर वाढण्याची शक्यता तूर्तास तरी कमीच आहे.

Advertisement

आवक वाढल्यास दर खाली येईल. सध्या महाराष्ट्रात कांद्याचे सरासरी दर 30 ते 35 रुपये प्रति किलो आहे. सध्या हवामान ठीक आहे. त्यामुळे अशा हवामानात कांद्यांचं चांगलं उत्पादन मिळेल. रब्बी हंगामातील कांदा बाजारात येणार असून भावही कमी होतील, अशी माहिती महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोले यांनी दिली आहे.

Advertisement

एकूण उत्पादनापैकी 65% कांदा रब्बी हंगामात पिकवला जातो. म्हणून तिसर्‍या हंगामातील कांदा अजून येणार आहे. त्यामुळे आता कांद्याच्या भावात वाढ होणार नसल्याचे बर्‍यापैकी स्पष्ट आहे. काल कांद्याला चांगले दर मिळाले होते. काल सोलापूर, वैजापूर अशा काही ठिकाणी कांद्याने 5 हजारी पार केली होती. अजूनही कांद्याला चांगले भाव मिळत आहेत.  

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply