अहमदनगर :
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत यंदा सर्वाधिक चुरशीची लढत पारनेर तालुक्यात पाहायला मिळणार आहे. इथे विद्यमान संचालक वकील उदय शेळके यांना शिवसेनेचे रामदास भोसले निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने अनपेक्षितपणे शेळके यांना निवडणुकीस सामोरे जावे लागले आहे.
महाविकास आघाडीने येथून पुन्हा एकदा शेळके यांनाच संधी दिली आहे. शेळके यांनी आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात १०५ पैकी ९६ मतदार उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे शेळके यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. आमदार नीलेश लंके यांनीही शेळके यांना पाठिंबा दिला आहे. अशावेळी भोसले कोणती खेळी करून विजयी होतात, याकडे राज्याचे लक्ष असेल.
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे, राहुल शिंदे यांनी सेवा संस्था मतदारसंघातून अर्ज मागे घेतले. मात्र, भोसले हे काही मागे हटले नाहीत. त्यामुळे आता या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशीच थेट लढत होत आहे.
भोसले यांच्या पाठीमागे कोण याचीच चर्चा जोरात आहे. दोन्ही उमेदवार आर्थिकदृष्ट्या सधन असल्याने यंदा ही निवडणूक मतदार पळवापळवीसाठीही गाजण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीने शेळके यांना कौल लावला आहे. मात्र, जर अनपेक्षित पद्धतीने भोसले यांनी ही निवडणूक जिंकली तर मग आमदार लंके यांच्या गटाला मोठा झटका बसेल.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये बनले आहेत ‘हे’ 9 यादगार विक्रम; जे नेहमीच प्रत्येकाच्या लक्षात राहतील
- एका दिवसात 6 लाख कोटींचा फटका; वाचा, नेमकं कशामुळे झालंय ‘एवढं’ नुकसान
- मुकेश अंबानींच्या बंगल्याबाहेर कार प्रकरणाचा पहिला पुरावा हाती; वाचा, पोलिसांनी नेमकं काय शोधलय
- सोन्याच्या भावात मोठी घसरण; वाचा, काय आहेत ताजे दर
- म्हणून मोदी सरकार कृषी विधेयकावर आहे ठाम; पहा नेमके काय म्हटलेय मंत्र्यांनी