Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्रात फ़क़्त ‘त्या’च जिल्ह्यात नाही बर्ड फ्ल्यू; वाचा किती विदारक परिस्थिती झालीय ते

मुंबई :

Advertisement

देशभरात करोना विषाणूचा कहर कमी होतानाच बर्ड फ्ल्यू नावाच्या विषाणूने पकड आणखी मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र राज्य हे त्यातही अग्रेसर आहे. मात्र, तरीही सिंधुदुर्ग या एकमेव जिल्ह्यात अजून एकाही पोल्ट्री फार्मवर बर्ड फ्ल्यूचे विषाणूयुक्त पक्षी आढळलेले नाहीत.

Advertisement

स्थलांतरित पक्ष्यांमुळे सुरुवातीला उत्तरेकडील राज्यानंतर महाराष्ट्रातील पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणे दिसू लागल्याने सुरक्षेचा उपाययाेजना सुरु करण्यात अाल्या आहेत. मात्र, २००६ पेक्षा यंदाच्या बर्ड फ्लूची तीव्रता अधिक आहे. राज्यात सिंधुदुर्ग वगळता सर्वच जिल्हयात बर्ड फ्लूची लक्षणे असलेल्या कोंबड्या आणि पक्षी अाढळून अाले अाहेत.

Advertisement

पुणे, मुंबई, नाशिक, सांगली, अमरावती, नंदुरबार परिसरात पाेल्ट्री व्यवसाय विस्तारलेला आहे. बर्ड फ्लूमुळे अनेकांचे रोजगार संकटात आले आहेत. राज्यात दैनंदिन सव्वाकाेटी अंडी उत्पादन हाेत असले तरी महाराष्ट्रातील दैनंदिन अंड्यांचा खप सव्वादाेन ते अडीच काेटी आहे.

Advertisement

तर, नंदुरबार जिल्हयातील नवापूर हे सध्या राज्याच्या बर्ड फ्लूचे मुख्य केंद्र बनले आहे. पाेल्ट्री व्यवसायिकांना माेठया नुकसानीला सामाेरे जावे लागत अाहे.
महाराष्ट्रात लेअर काेंबड्यांचे प्रमाण ८० लाख असून बाॅयलर काेंबड्या चार ते साडेचार काेटी आहेत.

Advertisement

तेलंगणा, अांध्रप्रदेश, कर्नाटकातून राेज ८० लाख ते एक काेटीपर्यंत अंडी पुरवठा होताे. बर्ड फ्लूमुळे चिकन विक्री साेबतच अंडी विक्रीवर ही यंदा १० ते १५ टक्के परिणाम झालेला अाहे. २००६ मध्ये बर्ड फ्लूचा प्रसार हा केवळ जळगाव अाणि नंदुरबार जिल्ह्यांपुरताच हाेता. त्यामुळे त्यावर वेळीच नियंत्रण मिळवता अाले. यंदा बर्ड फ्लूचा प्रसार राज्यातील सर्वच जिल्ह्यांत झाला अाहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply