दिल्ली :
जागतिक स्तरावर सोन्याच्या वाढीच्या परिणामामुळे राजधानी दिल्लीतही सोन्याच्या दरात हलकीशी वाढ नोंदवली गेली आहे. दिल्ली सराफा बाजारात, दहा ग्रॅम सोन्याची दर 36 रुपयांनी वाढले. या वाढीसह गुरुवारी सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 47,509 रुपयांवर पोहोचली. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी ही माहिती दिली. 1 दिवसापूर्वी सोन्याच्या किमती प्रति दहा ग्रॅम 47,473 रुपयांवर बंद झाल्या.
दुसरा मौल्यवान धातूच्या म्हणजेच चांदीच्या दरातही वाढ झालेली आहे. गुरुवारी चांदीचे दर प्रति किलो 454 रुपयांनी वाढले. या तेजीमुळे चांदीचा दर प्रति किलो 69030 रुपयांवर पोहोचला. आदल्या दिवशी चांदीचा दर दिल्ली सराफा बाजारात चांदी 68,576 रुपयांवर बंद झाला.
दिल्ली सराफा बाजारावर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणार्या सोन्याच्या भावाचा परिणाम झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 1844 अमेरिकन डॉलर (134332.63 रुपये) (१ किलो = 35.3 औंस) वर होता. दूसरा मौल्यवान धातू चांदीची किंमत जवळजवळ स्थिर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर 27.18 अमेरिकन डॉलर (1980.02 रुपये) वर स्थिर राहिले.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- विधानपरिषदेच्या कामकाजाला ‘अशी’ झाली सुरुवात; वाचून नक्कीच वाटेल अभिमान
- प्रविण दरेकरांनी विधान परिषदेच्या सभापतींकडे ‘ही’ आग्रही मागणी; वाचा, नेमकं काय म्हणालेत ते
- बाजारभाव अपडेट : टोमॅटोच्या भावातही हलकीशी घसरण; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6000 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,200 च्या पार; वाचा राज्यात कुठे, किती मिळतोय भाव