Take a fresh look at your lifestyle.

‘म्हणून’ कर्डिलेंची गुलालाची पोती तशीच राहिली; वाचा, ‘त्याच्यामध्ये त्याठिकाणी’ कर्डिलेंची खेळी नेमकी कुठे हुकली

अहमदनगर :  

Advertisement

काल जिल्हा बँक निवडणुकीचे अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. माजी आमदार राहुल जगताप, अनुराधा नागवडे, मंत्री शंकरराव गडाख, विवेक कोल्हे, आमदार आशुतोष काळे आदी दिग्गज मंडळी बिनविरोध निवडून आली. या संपूर्ण निवडणुकीत खरा गेम कुणी केला असेल तर तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी.

Advertisement

या निवडणुकीची चर्चा जोरदार होती. अगदी राज्यातील नेतेही या निवडणुकीकडे लक्ष ठेऊन होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीत जातीने लक्ष घातले आणि सगळे राजकारण आपल्या पद्धतीने फिरवले. काही ठिकाणी तर भाजप उमेदवार बिनविरोध झाले. तिथेही अजितदादांनीच फिल्डिंग लावली होती. एवढे सगळे होऊनही अगदी भाजपच्या समितीवर असणारे कर्डिले यांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.

Advertisement

राजकारणात ‘वस्ताद’ समजल्या जाणार्‍या कर्डिले यांची खेळी नेमकी कुठे हुकली, हे पाहणे महत्वाचे आहे. भाजपची साथ न देता थेट थोरातांच्या बैठकीला उपस्थिती लावल्याने कर्डिले यांना भाजपने पर्यायाने विखेंनी दूर केले. विखे एकाकी पडले असतानाही विखेंनी कडवट झुंज दिली. कर्डिले यांना आणि मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी टाकलेल्या डावाचा अंदाज न आल्याने अखेरीस कर्डिलेच एकाकी झाले.

Advertisement

जिल्हा बँक निवडणुकीत ‘कर्डिले म्हणतील तसं’ हे वातावरण होतं. आमदारकी गेली आणि कर्डिलेंना विरोध वाढत गेला. थोरातांच्या मागे फिरण्यापेक्षा अजितदादांची एकदा गाठ घेतली असती तर कालच गुलाल उधळता आला असता. ‘टोपी फिरली की राजकारण फिरते’ या म्हणीला आता फूलस्टॉप लागला आहे.

Advertisement

थोरात यांच्या मागे असूनही थोरात यांनी कर्डिलेंची साथ दिली की नाही? हा प्रश्न उरतोच. कारण महाविकास आघाडीची सूत्र थोरातांच्या हातात असताना कर्डिले यांच्यासाठी शब्द टाकणे थोरातांना जड नव्हते. राष्ट्रवादीचे नेते भगवान बेरड यांच्या पत्नी सत्यभामा बेरड यांच्याविरोधात आता कर्डिले हे ताकद लावणार आहेत. बिनविरोधचा मार्ग मोकळा असताना विखे आणि तनपूरेंनी मांडलेला डाव कर्डिलेंच्या लक्षात आला नाही? अजित पवार यांच्याकडे एकदा तरी जायला पाहिजे होते का? थोरात यांनी कर्डिलेंची साथ दिली की नाही? असे अनेक प्रश्न कर्डिले समर्थकांसमोर आणि कदाचित कर्डिलेंसमोर आहेत.

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply