Take a fresh look at your lifestyle.

शेतकर्‍यांनो पूर्ण करा ‘हे’ काम; अन्यथा नाही मिळणार किसान योजनेचा 2000 रूपयांचा 8 वा हफ्ता

मुंबई :  

Advertisement

पंतप्रधान किसान सन्मान निधीअंतर्गत आतापर्यंत 2000-2000 रुपयांचे 7 हप्ते शेतकर्‍यांना मिळालेले आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत 11.58 कोटी शेतकर्‍यांची नोंदणी झाली आहे. या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना वर्षाकाठी 2000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये 6000 रुपये मिळतात. आता पंतप्रधान किसान अंतर्गत 8 व्या हप्ताची प्रतीक्षा आहे. 8 वा हप्ता एप्रिलपासून येणे सुरू होईल, असा अंदाज आहे.

Advertisement

अशा परिस्थितीत तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमची नोंदणी त्वरित करा. नोंदणीनंतरही खात्यात पैसे येत नसल्यास पीएम किसानची अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ यावर जाऊन चुका सुधारू शकता. जर तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चुका झाल्या असतील तर निधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे आपल्या चुका आताच दुरुस्त करून घ्या.

Advertisement

पीएम किसान पोर्टलच्या मते, पहिला हप्ता 3,16,04,000 शेतकर्‍यांना देण्यात आला. दुसरा हप्ता 6,63,17,001 शेतकरी, तिसरा हप्ता 8.75 कोटी, चौथा 8.94 कोटी, 5 वा हप्ता 10.48 कोटी शेतकरी, सहावा 10.21 कोटी आणि 7 वा हप्ता मिळविणार्‍या शेतकर्‍यांची संख्या 9.45 कोटी आहे. 7 वा हप्ता अद्याप खात्यात येत आहे.

Advertisement

अशा सुधाराव्यात चुका :-

Advertisement
  1. https://pmkisan.gov.in/  या वेबसाईटवर जा.
  2. फार्मर कॉर्नर वर क्लिक करून  बेनेफिशियरी स्‍टेटसवर क्लिक करा.
  3. तिथे आपल्याला आधार नंबर, अकाउंट नंबर आणि फोन नंबरचा पर्याय दिसेल.
  4. आधार नंबर भरा, कैप्चा कोड सबमीट करा.
  5. आता तुम्ही तुमची सगळी माहिती चेक करून, चुकीची माहिती असल्यास दुरुस्त करून घ्या.    

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply