एकदा चर्जिंग केल्यावर 125 किलोमीटर मायलेज देणार ‘ही’ स्कूटी; वाचा भन्नाट फीचर्स आणि किंमत
मुंबई :
दिवसेंदिवस इलेक्ट्रिक कारमध्ये अनेक मोठ्या कंपन्या उतरत आहेत. विविध नवनवीन संशोधन घेऊन ग्राहकांना आपल्याकडे ओढण्यासाठी कंपन्यांची स्पर्धा लागलेली आहे. अशातच ऑटो क्षेत्रातील मोठी बातमी समोर आली आहे. एका स्वदेशी कंपनीने एक भन्नाट फीचर्स असलेली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. जी एका चार्जमध्ये तब्बल 125 किलोमीटर जाऊ शकणार आहे.
दिल्लीतील इलेक्ट्रिक टू व्हीलर कंपनी कोमाकीने ही नवीन स्कूटर लाँच केली असून KOMAKI SE असे या स्कूटीचे नाव आहे. या स्कूटरची किंमत ९६ हजार रुपये आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कोमाकी एसई च्या लिथियम आयन बॅटरीला फुल चार्ज करण्यासाठी केवळ १.५ युनिट्ची वीज लागते. ही स्कूटर दिसायला एकदम खास आहे. हाय टेक फीचर्स देण्यात आलेल्या या स्कूटरमध्ये टॉप स्पीड ८५ किलोमीटर प्रति तास इतका आहे.
असे आहेत फीचर्स :-
- तीन रायडिंग मोड्स
- चार कलर, गार्नेट रेड, डीप ब्लू, मेटालिक गोल्ड आणि जेट ब्लॅक मध्ये उपलब्ध
- 3KW BLDC इलेक्ट्रिक मोटर आणि डिटेचेबल लिथियम आयन बॅटरी पॅक
- डेडिकेटेड क्रूझ कंट्रोल (जे भारतात कुठल्याच स्कूटरला नाही)
- यूएसबी चार्जिंग, फ्रंट स्टोरेज स्पेस
- एलईडी डिस्प्ले, मल्टीमीडिया कंट्रोल स्विच, इनबिल्ट ब्लूटूथ स्पीकर
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : तूर 7,200 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6600 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : कांद्याचे भाव घसरले; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक