Take a fresh look at your lifestyle.

पोस्ट ऑफिस MIS : या सरकारी योजनेतून दरमहा खात्यात जमा होणार पैसे; वाचा, किती आणि कसा होईल फायदा

मुंबई :

Advertisement

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS) ही एक सरकारी छोटी बचत योजना आहे, जी गुंतवणूकदारांना दरमहा निश्चित रक्कम मिळविण्याची संधी देते. या योजनेंतर्गत एकल किंवा संयुक्त खात्यात एकमुखी रक्कम खात्यात जमा केली जाते. त्या रकमेनुसार, प्रत्येक महिन्यात आपल्या खात्यात पैसे येत असतात.

Advertisement

ही योजना 5 वर्षांची आहे, जी आणखी 5-5 वर्षांसाठी वाढविली जाऊ शकते. पोस्ट ऑफिस योजना असल्याने ती पूर्णपणे जोखीम मुक्त आहे आणि सरकार येथे 100% गुंतवणूकीची सुरक्षा हमी देते. पोस्ट ऑफिस एमआयएस योजनेंतर्गत मासिक खात्यात येणारी रक्कम कशी ठरविली जाते ते जाणून घ्या.

Advertisement

अटी :-

Advertisement

या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी आपण भारतीय असणे आवश्यक

Advertisement

या योजनेत कुणी करावी गुंतवणूक :-

Advertisement

ज्या गुंतवणूकदारांना दरमहा निश्चित उत्पन्न हवे असते त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिसचे मासिक उत्पन्न ही एक चांगली योजना आहे. याशिवाय सेवानिवृत्तीनंतर जर एकरकमी रक्कम मिळाली तर ती रक्कम सुरक्षित ठेवून दरमहा निश्चित रक्कम मिळू शकते. तुम्हाला हप्त्याऐवजी एकदाच गुंतवणूक करून नियमित परतावा हवा असेल तर हा एक चांगला पर्याय आहे.

Advertisement

हेही घ्या लक्षात :-

Advertisement

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत सिंगल और ज्वॉइंट  खाती उघडण्याची सुविधा आहे. सिंगल अ​काउंटमधून जास्तीत जास्त साडेचार लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. त्याचबरोबर तुमचे ज्वॉइंट अकाउंट असल्यास तुम्ही जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवू शकता. संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 3 प्रौढ असू शकतात. परंतु कमाल मर्यादा केवळ 9 लाख आहे.

Advertisement

किती मिळेल व्याज :-

Advertisement

चालू तिमाहीसाठी, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेसाठी सरकारने वार्षिक व्याज दर 6.6 टक्के निश्चित केला आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply