Take a fresh look at your lifestyle.

बिजनेस इन्फो | म्हणून होतो उद्योग व उद्योजकाचा जन्म; वाचा नेमकी काय प्रक्रिया असते ते

कोणताही उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक आत्मिक प्रेरणा लागते. ती असते पैसे कमावण्याची, आपली ओळख सिद्ध करण्याची, वारसा पुढे नेण्याची किंवा जगाला नवीन काहीतरी देऊन इतिहासात नाव कोरण्याची. याच प्रेरणेने उद्योजक भारावून जातात आणि एखाद्या कल्पनेला मूर्तरूप देतात.

Advertisement

उद्योगाचा जन्म कसा होतो आणि त्याचा विकास कसा होतो याचे कोणतेही लिखित नियम नसतात, त्यामुळेच आपण पाहतो की, अगदी अशिक्षित मंडळीही यशस्वी उद्योजक असतात. मात्र, एक गुण सर्वांना यशस्वी होण्यासाठी लागतो ते म्हणजे सगळ्यांना सांभाळून घेऊन पुढे जाण्याचा. आपल्याला वाटते त्या उद्योगासंबंधी संधी शोधण्यापासून याची सुरुवात होते. मग आपण त्याची माहिती घेतो, अभ्यास करतो आणि अडचणी जाणून घेण्यासाठी यापूर्वी असाच व्यवसाय करणाऱ्या मंडळींच्या भेटी-गाठी घेतो. त्याद्वारे यशस्वी आणि धडपडत असलेली मंडळी आपल्याला भेटतात. काहीजण खरी माहिती देतात, तर अनेकजण विषय उडून लावतात.

Advertisement

अशा पद्धतीने घडत असलेल्या अनेक गोष्टीमध्ये बऱ्याचदा समस्या भेडसावत असतात. कारण, आपल्याला माहिती देण्यासाठी सगळेच उत्सुक असतात असेही काही नाही. मग आपल्याला वाटते ती गोष्ट व्यवहार्य आहे किंवा नाही हेही तपासून घ्यावे लागते. त्यासाठी खुल्या मनाने त्या विषयावर सगळ्यांशी चर्चा करा. तरच अशा अडचणीतून मार्ग निघू शकेल. आपण सुरू करीत असलेल्या व्यवसायाची सेवा ग्राहकाला अतिशय गरजेची असते, पण ती देणारी व्यवस्था नसते. अशावेळी आपल्याला खऱ्या अर्थाने संधी असते.

Advertisement
Source : Google

अशा ठिकाणी व्यवसायाची संधी शोधू शोधण्यासह बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करूनही नवीन संधी आपण सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करू शकतो. एखादे उदाहरण म्हणून आपण बीव्हीजी इंडिया कंपनीचे उदाहरण पाहूया. आपल्याकडे वर्षानुवर्षे स्वच्छता आणि ऑफिस मेंटेनन्स यांची कामे चालू होती. सुप्रसिद्ध उद्योगपती हणमंतराव गायकवाड यांनी याच सेवेला एक सिस्टीम म्हणून विकसित केले आणि हजारो कोटींची एक कंपनी उभी राहिली. जगातील सर्वात बलाढ्य असलेली कंपनी म्हणजे वॉलमार्ट. एका ठिकाणी सिगारेट मिळत नसल्याचे पाहून छोटेखानी टपरी सुरू केलेल्या सॅम वॉल्टन यांनी याची मुहूर्तमेढ रोवली. लोकांना पाहिजे ते विकण्याच्या धोरणाने मग वॉलमार्ट नावाचे मोठे दुकान उभे राहिले.

Advertisement

एकूणच लीकांची मागणी आणि आपली सेवा यांची योग्य सांगड घालून आपण व्यवसायात पुढे जाऊ शकतो. अमेझॉन नावाची कंपनी आता जगभरात विस्तारली आहे. डिजिटल जगात ऑनलाईन खरेदी आणि थेट घराच्या उंबऱ्यावर उत्पादन पोहीच देण्याची ही कल्पना. मात्र, तिलाच लोकांनी डोक्यावर घेतले. कारण, इथे मिळणारे खरेदीचे स्वातंत्र्य आणि धकाधकीच्या जीवनात खरेदीसाठी खूप कमी वेळ उरला असल्याने ही कंपनी त्या निर्माण झालेल्या पोकळीत बरोबर फिट्ट झाली आणि जगाला एका वेगळ्या वळणावर नेण्याचे काम जेफ बोजेस करू शकले.

Advertisement

(भाग 3)

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो.  9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply