Take a fresh look at your lifestyle.

ADCC बँक निवडणूक : त्यांची झाली बिनविरोध निवड; पहा कोण कुठला संचालक बनलेत ते

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा बँक निवडणुकीच्या अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी विद्यमान चेअरमन सिताराम पाटील गायकर, मंत्री शंकरराव गडाख , माजी आमदार राहुल जगताप, माधवराव कानवडे व आमदार आशुतोष काळे या पाच ही नेत्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Advertisement

 मंत्री गडाख यांच्या विरोधात रत्नमाला विठ्ठलराव लंघे, कारभारी जावळे, शिवाजीराव शिंदे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने मंत्री शंकरराव गडाख यांची बिनविरोध निवड झाली. तसेच विद्यमान चेअरमन सिताराम पाटील गायकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Advertisement

आमदार राहुल जगताप यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बाजार समितीचे संचालक वैभव पाचपुते आणि प्रवीण कुरुमकर यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने जगताप यांचा जिल्हा बँकेचे संचालक होण्याचा मार्ग सुकर झाला.

Advertisement

संगमनेर सोसायटी मतदारसंघातून माधवराव कानवडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या विरोधात असलेल्या चौघांनी आपले अर्ज मागे घेतल्याने कानवडे यांची बिनविरोध निवड झाली. मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे गटाभोवती बँकेची निवडणूक केंद्रीत झाली आहे.

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply