Take a fresh look at your lifestyle.

पालकांसाठी मोठी बातमी; लॉकडाउनच्या काळातील फीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

मुंबई :

Advertisement

कोरोनामुळे राज्यातील आणि देशातील शाळा बंद होत्या. नंतरच्या काळात सिस्टिम उभा राहिल्याने ऑनलाइन लेक्चर्स सुरू झाले. मात्र त्या काळात अनेक पालकांच्या हाताला उत्पन्न नव्हते, म्हणून शाळेची फी भरायची की नाही, यावरून सुरू झालेला वाद थेट कोर्टात जाऊन पोहोचला. अखेर  सर्वोच्च न्यायालयाने ‘कोरोना लॉकडाऊन काळातील शाळांची फी पूर्णच्या पूर्ण भरावीच लागेल’, असा निकाल दिला आहे.   

Advertisement

लॉकडाऊनमुळे 2020-21 या शैक्षणिक वर्षातील आपल्या मुलांच्या शाळेची फी पूर्णपणे माफ होईल किंवा फीमध्ये काही अंशी सवलत तरी मिळेल, या आशेवर बसलेल्या देशभरातील पालकांना सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने मोठा झटका बसला आहे. न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांनी नुकताच शाळेच्या फीविषयी हा निर्णय दिला असून आता पालकांना फी भरणे बंधनकारक आहे.

Advertisement

या गोष्टीही घ्या लक्षात :-

Advertisement
  1. आता फी एकाएकी भरणे शक्य नसल्याने पालकांना सहा हप्त्यांमध्ये फी भरण्याचा पर्याय दिला गेला आहे.
  2. पालकांनी फी भरली नाही म्हणून मुलांचे शाळेतील नाव काढून टाकता येणार नाही, ही तंबी शाळांसाठी देण्यात आलेली आहे.
  3. दहावी – बारावी इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी फी भरली नाही म्हणून संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास परवानगी नाकारू नये .

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply