Take a fresh look at your lifestyle.

आता शेतकर्‍यांनाही मिळणार तब्बल 36 हजारांची पेन्शन; वाचा, कसा मिळवायचा लाभ

मुंबई :

Advertisement

अशा अनेक योजना सरकार चालवत असते, ज्याद्वारे तुम्हाला पैसे  मिळविण्याचा मार्ग नेहमीच खुला असतो. शेतकर्‍यांसाठीही केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत असते. आज आम्ही तुम्हाला  अशा योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे शेतकर्‍यांना पेन्शन म्हणून तब्बल 36 हजार रुपये दिले जाणार आहेत.

Advertisement

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत, देशात 11.5 कोटी शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे. आपण यात सामील असाल तर आपल्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. मोदी सरकारकडून दरवर्षी 36 हजार रुपये पेन्शन योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. सरकार आपल्याकडून यासाठी कोणतीही कागदपत्रे विचारणार नाही. ही योजना आपल्या वृद्धावस्थेसाठी एक मोठा आधार होईल.

Advertisement

विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या खिशातून या योजनेचा प्रीमियम कापला जाणार नाही. त्याऐवजी सरकारकडून वार्षिक स्वरूपात देण्यात येणाऱ्या 6000 रुपयांतून ते पैसे वजा केले जातील. फक्त यासाठी शेतकऱ्याला तसा पर्याय निवडावा लागेल. हरियाणा हा प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा सर्वात मोठा लाभार्थी आहे. महत्त्वाचे म्हणजे हरियाणा लोकसंख्येमध्ये अगदी कमी आहे. शेतकर्‍यांच्या जनजागृतीमुळे येथे सुमारे साडेचार लाख नोंदणी झाली आहे.

Advertisement

अर्धा प्रीमियम मोदी सरकार भरत आहे, निम्मे तुम्हाला पैसे द्यावे लागतील. आपल्याला पाहिजे तेव्हा आपण या योजनेतून बाहेर देखील पडू शकता. त्याचे पैसे बुडणार नाहीत. जोपर्यंत योजनेंतर्गत ते पैसे बँकेत जमा आहेत, तोपर्यंत बँकांच्या बचत खात्याइतकेच त्यावर व्याज मिळेल.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply