Take a fresh look at your lifestyle.

भाजपने दाखवली मनसेसोबत युतीची तयारी, मात्र आहे ‘ती’ अट; वाचा, चंद्रकांत पाटलांनी काय म्हटलेय ते

मुंबई :

Advertisement

सध्या अधून मधून मनसे-भाजप युतीच्या चर्चा चालू असतात. काही दिवसांपूर्वी भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. अशातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील मनसेसोबत युती करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र यावेळ त्यांनी एक अटही समोर ठेवली आहे.

Advertisement

याविषयी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अमराठी कार्यकर्ते आणि नेते सहभागी होणं, ही चांगली गोष्ट आहे. मनसेसोबत युती होऊ शकते, पण त्यांनी अन्य प्रांतियांबद्दलची भूमिका बदलली पाहिजे.

Advertisement

पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, कोणी आपला पक्ष कसा वाढवायचा, याचं स्वातंत्र्य आपल्या लोकशाहीत आहे. मनसेमध्ये अमराठी सहभागी होत असतील, तर ही चांगली गोष्ट आहे. मनसेच्या देशभक्ती आणि हिंदुत्वाबद्दल शंका नाही. त्यामुळे मनसेसोबतच्या युतीबाबत तुम्ही विचारत असाल, तर मनसेसोबत युती होऊ शकते.

Advertisement

यावेळी त्यांनी राज्यपालांना विमान नाकारल्याच्या मुद्दयावरुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. ते म्हणले की, राज्यपालांना विमान नाकारणे हे कदृपणाचे, क्षुद्रपणाचे लक्षण आहे. साधारणपणे राज्यपालांना जेव्हा प्रवासाला जायचे असते तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयाकडे फाईल पाठवायची असते आणि ती तत्काळ क्लिअर करायची असते. पण ती झाली नाही, त्यामुळे राज्यपालांना खाजगी विमानाने जावे लागले, हे द्वेषाचं, सुडाचं टोक आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply