Take a fresh look at your lifestyle.

म्हणून थेट ईडीलाच पाठवली नोटीस; अॅड. सरोदे यांनी मागितली हक्काची रक्कम

पुणे :

Advertisement

ईडी म्हटले की राजकीय नेत्यांना घाम फोडणारी केंद्र सरकारची संस्था असेच चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. मात्र, त्याच ईडीला पुण्यामधील प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी नोटीस पाठवली आहे. त्यामुळे सध्या हा विषय ट्रेंडमध्ये आहे.

Advertisement

सरोदे यांनी इतरांना नोटीशी पाठवणार्‍या ईडीलाच नोटीस पाठवली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सक्तवसुली संचालनालयाने आपले 1440 रुपये थकवले असून ते तातडीने परत करावे.

Advertisement

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही घाम फोडणारी ही ईडी संस्था आतापर्यंत फ़क़्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधाक्षा शरद पवार यांच्या नोटीसच्यावेळी जराशी वेगळी वाटली होती. अन्यथा अनेकांना झटक्यात नीट करण्यासाठी ही संस्था ओळखली जाते.

Advertisement

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ईडी चौकशी करत आहे. याच चौकशीचा भाग म्हणून ईडीने दामानिया यांचे वकील असीम सरोदे यांचीही मदत घेतली होती. चौकशीसाठी कागदपत्र गोळा करताना ईडीने सरोदे यांच्या कार्यालयामधून शेकडो कागदपत्रांच्या झेरॉक्स घेतल्या. मात्र या झेरॉक्स देण्याआधी सरोदे यांनी सर्व प्रतींचा खर्च ईडीला द्यावा लागेल, अशी अट घातली होती. खर्च उचलण्याची तयारी ईडीने दाखवली होती. मात्र त्यानंतर ईडीने हा खर्च सरोदे यांना दिलेला नाही. म्हणून आता सरोदे यांनी थेट ईडीलाच नोटीस पाठवली आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply