Take a fresh look at your lifestyle.

पुण्यात भाजपचा स्वबळाचा नारा; पहा नेमके काय म्हटलेय फडणवीसांनी

पुणे :

Advertisement

महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीस अवघे एक वर्ष बाकी आहे. त्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचा जनाधार आणखी वाढवून २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्यात पुन्हा येण्याच्या तयारीने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामाला लागले आहेत. पुणे महापालिका निवडणुकीबाबत त्यांनी हाच संदेश दिला आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, पुणे महापालिकेसह आवर्जुन सगळ्या राज्यातच लक्ष घालत असतो. सगळ्याच महापालिकांमध्ये जात असतो. पुण्यात आम्ही अनेक प्रकल्प सुरु केले. त्याचा आढावा घ्यायचा असल्याने महापौरांनी मला पुण्यात आमंत्रित केले. म्हणून मी आलो आहे. पुण्यातल्या नगरसेवकांच्या कामांबाबत समाधानी आहे.

Advertisement

आतापासूनच भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस आणि मनसे यांच्यासह विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी पुणे शहराचे दौरे वाढवले असून पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत बैठका घेतल्या जात आहेत. मात्र जुना मित्र असलेल्या शिवसेनेने वेगळी चूल मांडल्याने भाजप मनसे युती संदर्भात चर्चांना उधाण आले होते. मात्र भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply