Take a fresh look at your lifestyle.

..आणि जगतापांनी पाचपुतेंना असा दिला धक्का; खासदार विखेंचीही मिळाली साथ..?

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आतापर्यंत महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के दिले आहेत. मात्र, त्याचवेळी श्रीगोंदा तालुक्यामध्ये मात्र, भाजप आमदार बबनराव पाचपुते यांना माजी आमदार राहुल जगताप यांनी जोरदार धक्का दिला आहे.

Advertisement

जामखेडमध्ये विद्यमान संचालक जगन्नाथ राळेभात यांना बिनविरोध निवडून आणताना विखे व आमदार रोहित पवार यांनी पक्षभेद विसरून एकीची वज्रमुठ आवळली होती. त्याचीच झलक इतरही ठिकाणी पाहायला मिळत आहे. कारण, आता श्रीगोंदा सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात महाविकास आघाडीचे राहुल जगताप हे बिनविरोध संचालक बनले आहेत.

Advertisement

आमदार पाचपुते यांनी या मतदारसंघातून वैभव पाचपुते व प्रवीण मुरुमकर यांना उमेदवारी अर्ज भरायला सांगितले होते. त्या दोघांपैकी कोण अखेर रिंगणात राहणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. मात्र, अखेरीस आज सकाळी पाचपुते यांनी माघार घेऊन जगताप यांना पाठींबा दिला. तर, दुपारी ऐन घाईच्या कालावधीत मुरुमकर यांनी पाचपुते गटाची साथ सोडत थेट जगताप गटाच्या गाडीत बसणे पसंत केले.

Advertisement

त्यामुळे पाचपुते गटाला मोठा धक्का बसला आहे. जगताप यांच्या निवडीनंतर भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे आणि माजी आमदार जगताप यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो नवा की जुना, हे स्पष्ट नाही. मात्र, त्याद्वारे दावा केला जात आहे की, विखेंच्या मदतीने जगतापांनी जिल्हा बँकेत बिनविरोध जाण्यात यश मिळवले आहे.

Advertisement

मात्र, विखे गटाने अजूनही याबाबत थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. मग अशावेळी राहुल जगताप हे विखे गटाचे संचालक असणार की महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या महाविकास आघाडीच्या गटाचे, हाच कळीचा मुद्दा बनणार आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply