Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ कारणामुळे थांबली द्राक्ष खरेदी; थंडीचा आणि ढगाळ वातावरणाचा द्राक्ष पिकाला बसला मोठा फटका

सांगली :

Advertisement

सध्या राज्यात काही ठिकाणी ढगाळ आणि काही ठिकाणी पावसाचे वातावरण आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम पिकांवर होताना दिसत आहे. द्राक्ष पिकाच्या अडचणी मात्र अजूनच वाढल्या आहेत. नाशिक आणि सांगली या  द्राक्ष पट्ट्यात वातावरणात बदलाचा फटका बागेला बसू लागला आहे. 

Advertisement

आधिक द्राक्ष निर्यात करण्यास अडचणी येत असल्याने द्राक्ष खरेदी थांबलेली आहे. अशातच 3 दिवसांपूर्वी तासगाव तालुक्यात पाऊस झाला. तयार द्राक्ष मणी क्रॅकिंग, डाऊनीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता वाढली आहे. परिणामी द्राक्ष उत्पादक शेत्क्र्‍यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याने दिलेल्या माहितीनुसार, बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष बागांना नुकसान होत आहे. द्राक्ष मणी तडकायला लागले असल्याने पिकाची मोठी अडचण निर्माण झाली आहे.    

Advertisement

काल नाशिकमधील द्राक्ष पट्ट्यातही थंडीचा फटका बसताना दिसत आहे. थंडीची लाट व बर्फवृष्टीमुळे द्राक्ष मालाला उठाव नाही त्यातच पिकाचे नुकसान होण्याची शक्यताही वाढत आहे. तज्ञांनी दिलेल्या महितीनुसार, तापमानात सातत्याने मोठा बदल होत राहिला तर द्राक्ष पिकांना मोठा फटका बसून गुलाबी मणी होण्याची समस्या वाढू शकते. तसेच मणी फुगवण अवस्थेतील पिकांना वाढ होण्यास अडचणी येण्याचीही शक्यता आहे.

Advertisement

अशातच अनेक ठिकाणी निर्यातीस अडचणी येत असल्याने व्यापार्‍यांनी खरेदी थांबवलेली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांची डोकेदुखी वाढली आहे.   

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply