गुड न्यूज फॉर फार्मर : त्यामुळे बेबीकॉर्न बियाण्याचे भाव होणार कमी; पहा नवा पर्याय कोणता ते
दिल्ली :
लोणचे बनवण्यासह सूप, पिझ्झा आणि अनेक फास्टफूडमध्ये महत्वाचा आणि गोड चवीचा घटक असलेल्या बेबीकॉर्न (मक्याची छोटी कणसं, याची व्हरायटी पूर्णपणे वेगळी असते) शेतीमध्ये बियाणे हा घटक खूप मोठा आहे. कारण, याचे बियाणे सध्या तब्बल ६०० रुपये किलोने घेऊन मग शेतकऱ्यांना शेती करावी लागत आहे. मात्र, आता भारतीय बियाणे येणार असून त्याचे भाव फ़क़्त २०० रुपये किलो असतील असेच संकेत आहेत.
देशातील प्रथम परागणरहित (मेल स्टेराइल) बेबीकॉर्न मका बियाणे तयार होताना मार्गावर आहे. त्याचे अंतिम ट्रायल चालू आहेत. भारतीय कृषि अनुसंधान – पूसा (नवी दिल्ली) व चौधरी चरण सिंह हरियाणा कृषी विद्यापीठाचे क्षेत्रीय अनुसंधान केंद्र कर्ल यांनी संयुक्तपणे यावर संशोधन ट्रायल घेतल्या आहेत. त्यात एचएम-4 यास त्यांनी मेल स्टेराइलमध्ये परिवर्तित केले आहे.
सध्या सिजेंटा-5414 हे एकमेव बियाणे आहे जे शेतकऱ्यांना बेबीकॉर्नसाठी उत्तम पर्याय आहे. या बियाण्याच्या व्यतिरिक्त इतर जातीच्या बियाण्यांना मजूर लावून बिजसंकर करावा लागतो. मात्र, आता भारतात नव्याने येणारे बियाणेही अशाच पद्धतीने मेल स्टेराइल असणार आहे.
संशोधक डॉ. फिरोज हुसेन यांनी सांगितले आहे की, हाइब्रिड एचएम -4 चं गुणधर्मांमधून विकसित असे हे बियाणे असेल. मेल स्टेराइल बीजमध्ये परागण होण्यासह याची क्वालिटी बेस्ट असेल.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com