Take a fresh look at your lifestyle.

पालकांना ‘सुप्रीम’ दणका; लॉकडाऊन काळातील स्कूल फीबाबत झाला ‘तो’ निर्णय

दिल्ली :

Advertisement

करोना विषाणूच्या लॉकडाऊन (टाळेबंदी) कालावधीत शाळा नव्हे तर अवघे जग ठप्प होते. त्यामुळे त्या कालावधीतील शालेय शुल्क न घेण्याची मागणी पालकांची होती. मात्र, यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना पालकांना दणका दिला आहे.

Advertisement

पालकांना मोठा झटका देताना सर्वोच्च न्यायालयाने निर्णय आहे दिला की, शैक्षणिक सत्र २०२०-२१ च्या शैक्षणिक सत्रासाठी पालकांना १००% फी भरावी लागेल.  अगोदरच्या शैक्षणिक वर्षापर्यंत जे शुल्क होते. त्याच पद्धतीने यंदाही भरावे लागेल.

Advertisement

फी-नियमन अधिनियम २०१६  ला आव्हान देताना विद्या भवन सोसायटी, सवाई मानसिंग विद्यालय, गांधी सेवा सदन आणि मॅनेजमेंट कमिटीच्या मॅनेजिंग कमिटी, सोसायटी ऑफ कॅथोलिक शिक्षण संस्था यांची एकत्रित सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने हा अंतरिम आदेश सोमवारी दिला आहे. त्यामुळे आता पालकांना आपल्या पाल्यांची फी भरावी लागणार आहे.

Advertisement

हप्त्यांमध्ये हे शुल्क जमा करता येणार आहे. तसेच फी न भरल्यामुळे कोणत्याही मुलाचे नाव शाळेतून वगळले जाणार नाही असेही कोर्टाने स्पष्ट केले. तसेच दहावी आणि बारावीच्या मुलांनाही फी जमा केली नाही तर परीक्षेला बसण्यास नकार दिला जाणार नाही.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply