Take a fresh look at your lifestyle.

कर्डिलेंच्या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष; महाविकासकडून कोणता कौल मिळाणार त्यावर असेल भिस्त

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा सहकारी बँकेतील एक दिग्गज आणि मातब्बर संचालक म्हणून आता माजीमंत्री शिवाजी कर्डिले यांची ओळख आहे. मागील सलग दोन निवडणुकीत बिनविरोध संचालक होण्याची किमया त्यांनी साधली होती. मात्र, आता यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेने त्यांच्यापुढे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे.

Advertisement

नगर तालुक्यात अनेक वर्षांपासून कर्डिले गटाला विरोध करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेने एकत्रित येऊन आघाडी केलेली आहे. आतातर महाराष्ट्र राज्यात हे तीन पक्ष एकत्र आहेत. अशावेळी या तीन पक्षांनी एकीची वज्रमुठ आवळून कर्डिले यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच कर्डिले हे भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे की महसूलमंत्री बाळासाहेब थोरात गटाकडे राहणार याचेही कोडे कायम आहे.

Advertisement

भाजपने यंदा सुरुवातीच्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँकेत स्वतंत्र पक्ष म्हणून लढण्याचा प्रयत्न केला. अंतर, अखेरीस विखे-कर्डिले यांच्यात जमले नाही, अन विखे यांनी राष्ट्रवादीच्या पवार कुटुंबाला हाताशी धरून जामखेडसह काही जागा बिनविरोध खिशात टाकल्या. मग, आता आज अखेरच्या अर्ज माघारीच्या दिवशी कर्डिले यांना आव्हान उरणार की नाही याचीच सगळ्यांना उत्सुकता आहे. आज सायंकाळी याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply