काका-पुतण्या पवारांनी दिला भाजप उमेदवारांना जाहीर पाठिंबा; वाचा, नगर जिल्हा बँक निवडणुकीत काय घडलाय प्रकार
अहमदनगर :
जिल्हा बँक निवडणुकीसाठी आजचा दिवस फार महत्वाचा आहे. आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीवर राज्यातील नेतेही लक्ष ठेऊन आहेत. या निवडणुकीत अनेक ऐतिहासिक घडामोडी बघायला मिळत आहेत. 2 दिवसांपूर्वी कर्जत-जामखेडचे आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी भाजप उमेदवाराला थेट आणि जाहीर पाठिंबा देऊ केला होता. तेव्हा नगर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा भाजप उमेदवाराला बळ देण्यासाठी आपल्या उमेदवारांना माघार घेण्यास सांगितले आहे.
एकूणच काय तर नगरच्या मातीत कसलेही राजकारण फिरू शकते, याचा प्रत्यय जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने येताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकरणात सोयिस्कर भूमिकेसाठी जेष्ठ नेते शरद पवार ओळखले जातात. आता पुतण्या अजित पवार आणि नातू रोहित पवारही सोयिस्कर भूमिका घेऊ लागल्याचे समोर आले आहे.
माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले जगन्नाथ राळेभात पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या संचालकपदी बसणार आहेत. मात्र त्यांचा हा मार्ग राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यामुळे सोपा झाला आहे. रोहित पवारांनी हस्तक्षेप करत भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही असाच प्रकार अकोले तालुक्यात घडवून आणला आहे.
ऐनवेळी पिचड यांच्यासह भाजपमध्ये जाणार्या सीताराम गायकर यांच्याविरोधात असणार्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते दशरथ सावंत व सुरेश गडाख यांनी अर्ज मागे घेतले आहेत. यावेळी त्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शब्द अंतिम मानत आम्ही अर्ज मागे घेतले आहेत. पवार यांनी आपल्याला कारखान्यात सहकार करण्याचा शब्द दिल्याचेही सांवत यांनी सांगितले आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- चला विकुया : मोदी सरकार ‘या’ क्षेत्रातील शेकडो कंपन्या विकणार, वाचा, कंपन्या विकल्याचा काय होणार फायदा आणि तोटा
- मराठा आरक्षण उपसमितीने घेतला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या तयारीचा आढावा; वाचा, काय आहे परिस्थिती
- आता 7/12 आणि घरावर लागणार पत्नीचे नाव; महिलांनो, तुमच्या फायद्याची ही योजना घ्या समजून
- अवघ्या ६९ रुपयात मिळवा गॅस सिलिंडर; त्यासाठी करावे लागेल ‘हे’ एकच काम
- इंधनदरवाढीने आर्थिक गणित कोलमडले; वाचा, तुमच्या शहरातील आजचे भाव